
शैक्षणिक वर्ष २०१९-२० पासून इयत्ता नववी ते बारावीची विषयरचना व मूल्यमापन पद्धती याचा अभ्यास करण्यासाठी शिक्षण आयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्यात आली असल्याची माहिती शालेय शिक्षणमंत्री आशिष शेलारयांनी दिली.
गठीत करण्यात आलेली समिती सी.बी.एस.ई, आय.सी.एस.ई आणि राज्य मंडळाची विषय योजना, मूल्यमापन पद्धती याचा अभ्यास करून १० दिवसांत अहवाल सादर करणार आहे. सदर अहवाल विचारात घेऊन नववी ते बारावीपर्यंत विषय योजना व मूल्यमापन याबाबत पुढील निर्णय घेण्यात येणार आहेत.






