
सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) महत्त्वपूर्ण निर्णय दिला आहे. सर्व राज्य बोर्डांना आजपासून 10 दिवसाच्या आत मुल्यांकनाची योजना जारी करण्यास सांगितली आहे. त्याचबरोबर सीबीएसई (CBSE) आणि आयसीएसई (ICSE) बोर्डाप्रमाणे 31 जुलै पर्यंत 12 वीचे निकाल जाहीर करण्याचेही निर्देश दिले आहेत.
देशात कोरोना व्हायरस (Coronavirus) संकटाच्या पार्श्वभूमीवर 12 वी बोर्डाच्या परीक्षा (HSC Exam) रद्द करण्यात आल्या. त्यामुळे अंतर्गत मुल्यांकनाच्या आधारे परीक्षांचे निकाल जाहीर करण्यात येणार आहेत. यावरुन सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) महत्त्वपूर्ण निर्णय दिला आहे.
देशात सर्व राज्यांच्या बोर्डांसाठी मुल्यांकनाची एकच योजना असू शकत नाही, असे सुप्रीम कोर्टाने म्हटले आहे. बारावीची परीक्षा रद्द करण्याची मागणी करणार्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाने सुनावणी घेताना असा आदेश मंजूर करण्यास नकार दिला आहे.
सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी सीबीएसई आणि सीआयसीएसईच्या 12 वीच्या बोर्ड परीक्षा रद्द करण्याच्या निर्णयाला आव्हान देणारी याचिका फेटाळून लावली आणि विद्यार्थ्यांचे मूल्यांकन करण्यासाठी मंडळाने प्रस्तावित केलेल्या मूल्यांकन योजनांना मान्यता दिली.
दरम्यान, सीबीएसईचा दहावीचा बोर्ड निकाल 20 जुलैपर्यंत आणि बारावीच्या विद्यार्थ्यांचा निकाल 31 जुलैपर्यंत जाहीर होणार आहे.






