
रात्रभरापासून कोसळलेल्या मुसळधार पावसामुळे मुंबईची तुंबई झाल्याचे पाहायला मिळत आहे. मुंबईला पावसाने अक्षरशः झोडपून काढले आहे. यामुळे मुंबईतील अनेक सखल भागात पाणी साचले आहे. तर काही ठिकाणी वाहतूक कोंडी झाली आहे.
मुंबईत रात्रभर कोसळणाऱ्या पावसामुळे तीन दुर्घटना समोर आल्या आहेत. यात आतापर्यंत 18 जणांना प्राण गमवावे लागले आहेत.
मुंबईत कोसळणाऱ्या पावसामुळे हिंदमाता, सायन, किंग्ज सर्कल, धारावी, अंधेरी, कांदिवली, मिरारोड यांसह अनेक सखल भागात पाणी साचले आहे.
तसेच मुंबईतील पावसामुळे रेल्वेच्या तिन्ही मार्गावरील लोकल वाहतूक ठप्प झाली आहे, वाशीनाकााचेंबूर परिसरातील भारत नगर बी ए आर सी संरक्षक भिंत कोसळल्याची घटना घडली आहे. यात 14 जणांचा मृत्यू झाला आहे.
आतापर्यंत मुंबईतकोसळणाऱ्या पावसाने एकूण 32 बळीघेतले आहेत. मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे असे सूत्राकडून कळते आहे.
रविवारची सकाळ मुंबईकरांसाठी अत्यंत धक्कादायक ठरली आहे, विक्रोळी, चेंबूरमध्ये भिंत कोसळ्यामुळे आतापर्यंत २१जणांचा मृत्यू झाला आहे. घटनास्थळी अद्यापही शोधकार्य युद्धपातळीवर सुरू आहे. विक्रोळी सुर्यनगर परिसरामध्ये तीन ते चार घरांवर दरड कोसळली आहे तर पावसामुळे चेंबूरच्या भारत नगर भागातील झोपडपट्टीत भिंत कोसळली आहे.
सध्या घटनास्थळी एनडीआरफचे पथक दाखल झाले आहे. तसेच मुंबई महापालिका आणि अग्निशमन दलाच्या जवानांकडून बचावकार्य सुरु आहे.

चेंबूर, विक्रोळी दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना मदत जाहीर करण्यात आली आहे. मृतांच्या नातेवाईकांना केंद्राकडून २ लाख रूपयांची मदत जाहीर करण्यात आली. पावसामुळे मुंबईच्या चेंबूर आणि विक्रोळी भागामध्ये झालेल्या दुर्घटनांमुळे आत्तापर्यंत २१ जणांचा मृत्यू झाला.
केंद्र सरकारने आर्थिक मदत जाहीर केली आहे. मृतांच्या नातेवाईकांना पंतप्रधान राष्ट्रीय आपत्ती निधीमधून २ लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर करण्यात आली आहे.
त्यासोबतच, या दुर्घटनांमध्ये जखमी झालेल्या व्यक्तींना ५० हजार रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे. तर राज्य सरकारकडून मृतांच्या नातेवाईकांना ५ लाख रूपयांची मदत जाहीर केली आहे. जखमींना मोफत उपचार देण्याची घोषणा राज्याने केली. राज्य आणि केंद्र सरकारने सोशल मीडियाच्या माध्यमातून ही मदत जाहीर केली.






