
उद्या १५ जुलै रोजी पहाटे २ वाजून ५१ मिनिटांनी श्रीहरिकोटा येथील सतीश धवन स्पेस सेंटर येथून GSLV मार्क-३च्या मदतीने चांद्रयान-२ अवकाशात झेपवणार आहे. उद्या १५ जुलै रोजी पहाटे २ वाजून ५१ मिनिटांनी श्रीहरिकोटा येथील सतीश धवन स्पेस सेंटर येथून GSLV मार्क-३च्या मदतीने चांद्रयान-२ अवकाशात झेपवणार आहे.
लोकांना या ऐतिहासिक क्षणाचा साक्षीदार होण्यासाठी इस्रोने गेल्या काही दिवसांपासून थेट प्रक्षेपण दाखवण्याची सोय उपलब्ध करून दिली आहे. यासाठी एका खास गॅलरीची तयार करण्यात आली आहे. या गॅलरीत १० हजार लोक बसू शकतात. तुम्हालाही या चांद्रयान-२चे प्रक्षेपण पाहायचे असेल तर तुम्ही https://liveregister.isro.gov.in/LRC/ या लिंकवर जाऊन नोंदणी करू शकता. चांद्रयान-१ नंतर १० वर्षांनी इस्रोची ही चांद्रयान मोहीम होणार आहे.
लॉन्चिंग नंतर ५२ दिवसाने चांद्रयान-२ चंद्रावर पोहोचेल.






