
पारनेरच्या तहसीलदार ज्योती देवरे यांनी आत्महत्या इशारा देणारी ऑडिओ क्लिप व्हायरल केल्यानंतर जिल्ह्यात खळबळ उडाली होती. ज्योती देवरे यांनी अण्णा हजारे यांना राखी बांधली व तुमचे आशीर्वाद मला असू द्या अशी विनंती केली. ज्योती देवरे यांची आत्महत्येचा इशारा देणारे ऑडिओ क्लिप व्हायरल झाली होती त्यामुळे अहमदनगर जिल्ह्यात एकच खळबळ उडाली होती. त्यानंतर आमदार निलेश लंके यांनी अण्णा हजारे यांची भेट घेतली होती. आणि आता तहसीलदार ज्योती देवरे यांनी देखील अण्णा हजारे यांची भेट घेतली. यावेळी “खचून जाऊ नका, अपमान सहन करण्याची ताकद ठेवा, आत्महत्येचा विचार करणे योग्य नाही तो डोक्यातून काढून पुढील वाटचाल करा” असा सबुरीचा सल्ला अण्णा हजारे यांनी ज्योती देवरे यांना दिलाय.
पारनेर तहसीलदार ज्योती देवरे यांनी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची आज भेट घेतली. यावेळी “खचून जाऊ नका, अपमान सहन करण्याची ताकद ठेवा” असा सल्ला अण्णा हजारे यांनी दिला आहे. दरम्यान, आमदार निलेश लंके यांनी अण्णा हजारे यांची भेट घेत चर्चा केली. त्यावेळी योग्य त्या कारवाईसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी बोलणार असल्याचं अण्णांनी म्हटलं होतं.
असे भ्रष्ट अधिकारी तालुक्यात नकोत, वेळ पडली तर मी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी बोलेन असं अण्णा हजारेंनी म्हटलं आहे. या घटनेनंतर पारनेरचे आमदार निलेश लंके यांनी अण्णा हजारे यांची भेट घेतली. यावेळी ज्योती देवरे यांच्या कामाबाबत जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांनी विभागीय आयुक्तांना पाठवलेल्या अहवालाची प्रत अण्णांना दाखवली. त्यानंतर अण्णा हजारे यांनी देखील ज्योती देवरे यांच्याबाबत नाराजी व्यक्त केली आहे. इतकेच नाही तर योग्य त्या कारवाईसाठी वेळ पडली मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत बोलणार असल्याचे अण्णांनी सांगितले आहे.
तहसीलदार ज्योती देवरे यांनी अनेक कामात हस्तक्षेप करून हलगर्जीपणा केल्याचा ठपका आहे. तसेच वाळू साठ्यात गैरव्यवहार करून शासनाचे मोठं नुकसान केल्याचा ठपका देखील त्यांच्यावर आहे. ज्योती देवरे यांनी शासकीय कामात नितांत सचोटी व कर्तव्यपरायणता ठेवली नाही. कामाची जबाबदारी नीटपणे पार पाडली नाही. कामात हयगय केली आहे. वरिष्ठांच्या आदेशाचा भंग केला आहे, असे अहवालात नमूद करण्यात आलं आहे.
पारनेर तहसीलदार ज्योती देवरे यांनी ऑडिओ क्लिप तयार करून आत्महत्येचा इशारा दिला आहे. या क्लिपमुळे पारनेर तालुक्यासह जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. यापूर्वी अमरावतीचे वनाधिकारी दिपाली चव्हाण यांच्या आत्महत्येचा संदर्भ देत देवरे यांनी ऑडिओ क्लिप व्हायरल केली आहे. या क्लिपमध्ये महिला अधिकारी म्हणून काम करताना नोकरीत होणारा त्रास तसेच वरिष्ठांचे दुर्लक्ष या बाबत सविस्तर कथन ऑडिओ क्लिपमध्ये केले आहे. तहसीलदार यांच्या ऑडिओ क्लिपमुळे जिल्ह्यात चर्चेला उधाण आले आहे. आत्महत्या केलेल्या वनाधिकारी दीपाली चव्हाण यांना उद्देशून ज्योती देवरे यांनी स्वतःची ऑडिओ क्लिप तयार केलीय. मी लवकरच तुझ्या सोबत येत आहे, असं सांगून महिला म्हणून प्रशासनात कसा छळ होतो याचा उल्लेख ज्योती देवरे यांनी केलाय. आपल्याविरुद्ध प्रश्न उपस्थित करणे, दमदाटी करणे, मी मारहाण करते असे माझ्या गाडीत चालकाकडून लिहून घेणे, धमकी देणे असे अनेक प्रकार घडल्याचे देवरे यांनी क्लिपमध्ये नमूद केले आहे. इतकेच नाही तर कोविड लसीकरणावरून आमदार निलेश लंके यांनी आरोग्य कर्मचार्याला मारहाण केली आणि नंतर ही तक्रार मागे घेण्यात आली. या घटनेचा उल्लेखही ज्योती देवरे यांनी ऑडिओ क्लिप मध्ये केलाय.

तहसीलदार ज्योती देवरे यांनी स्वतःच्या बचावासाठी केलेला केविलवाणा प्रयत्न असल्याचे पारनेरचे आमदार निलेश लंके यांनी म्हणलंय. ज्योती देवरे यांच्यावर भ्रष्टाचाराचे अनेक आरोप असुन तसा अहवाल नाशिक विभागीय आयुक्तांनी पाठवला असल्याचेही आमदार लंके यांनी स्पष्ट केले आहे. यापूर्वी देखील जेव्हा तहसीलदार यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप झाले तेव्हा त्यांना सूचना केल्या. मात्र, त्यावेळी आत्महत्या करण्याचे मेसेज रात्री अपरात्री केल्याचेही निलेश लंके यांनी सांगितलं. ज्योती देवरे यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप असल्याने बचावासाठी केलेला प्रयत्न असल्याचं निलेश लंके स्पष्ट केलंय.






