

ट्रान्स ग्लोबल अंथ्रोप्युनर चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अँड ऍग्रीकल्चरचा (TECCIA) प्रथम वर्धापन दिन केंद्रीय सामाजिक न्याय व अधिकारिता राज्यमंत्री रामदास आठवले (भारत सरकार) यांच्या उपस्थितीत आज दिनांक 27 ऑगस्ट 2021 रोजी खारघर येथे संपन्न होणार आहे.
सदर वर्धापन दिनासाठी आद.श्रीमती ज्योतीताई ठाकरे(महिला आर्थिक विकास महामंडळ),आद.श्री.अविनाश महातेकर(माजी सामाजिक न्याय राज्यमंत्री),आद.श्री.जगदीश गायकवाड(उपमहापौर- पनवेल महानगरपालिका),आद.श्री.जयेश खाडे(मा.सल्लागार-वर्ड ड्रेड सेंटर),आद.श्री.दीप सिंह(व्यवसाय प्रमुख- येस बँक) यांच्या उपस्थितीत पार पडणार आहे.
नवीन व्यवसाय सुरू करणाऱ्या तसेच आपल्या व्यवसायाला मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात प्रसारित करण्याऱ्या उद्योजकांनी सदर कार्यक्रमात आवश्यक सहभागी व्हावे असे आवाहन टेकिया चे संस्थापक चेअरमन आद.चंद्रकांत जगताप यांनी केले आहे.
दुपारी ठीक ३.३० वा.एम.टी.डी.सी.रेसिडेन्सी,प्लॉट नं.१०,शिल्प चौक जवळ,ग्रीन फिंगर ग्लोबल स्कुल,सेक्टर-१२,खारघर,नवी मुंबई येथे संपन्न होणार आहे.






