
‘केसरबाई-१’ या चार मजली अधिकृत इमारतीमागे ‘केसरबाई-२’ ही अनधिकृत इमारत उभारण्यात आली होती. ‘केसरबाई-२’मध्ये चार ते पाच कुटुंबं आणि काही व्यावसायिक गाळे होते. सोमवारी सकाळी साडेअकरा वाजता इमारत हलल्यासारखी वाटली आणि क्षणार्धात तीन मजले कोसळले. त्यानंतर पोलिस, अग्निशमन जवान आणि ‘एनडीआरएफ’च्या पथकांनी मदतकार्य सुरू केले. हे मदत व बचावकार्य सुमारे ३० तासानंतर आज सायंकाळी पूर्ण झाले असून मृतांचा आकडा १४ वर पोहचला आहे. या दुर्घटनेत ९ जण जखमी झाले असून त्यांच्यावर जे. जे. रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
दुर्घटनेनंतर सुरू झालेलं शोध व बचावकार्य सुमारे ३० तासांनंतर थांबवण्यात आलं आहे. इमारतीचा संपूर्ण ढिगारा हटवण्यात आला असून बचावकार्य समाप्त झाल्याचं एनडीआरएफने जाहीर केलं आहे.






