
भाजपा बुलडाणा तालुकाध्यक्ष ॲड.सुनिल हासनराव देशमुख यांनी तालुक्यातील भाजपा पदाधिकारी यांना आव्हान केले होते की आदरणीय पंतप्रधान श्री.नरेंद्रजी मोदी यांचा वाढदिवस सामाजिक व लोकहिताचे उपक्रम घेऊन साजरा करावा. काल संपूर्ण तालुक्यात आ.सौ.श्वेताताई महाले पाटील व मा.आ. विजयराज शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच बुलडाणा भाजपा तालुकाध्यक्ष ॲड.सुनिल देशमुख यांच्या नेतृत्वाखाली तालुक्यातील गावांमध्ये विविध विकास कामांचे उद्घाटन तसेच भाजपा शाखा अध्यक्षणी वृक्षारोपण, वाचनालयात पुस्तक भेट आशा व इतर विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला.

भाजपा मासरूळ शाखेच्या वतीने गावातील उत्कृष्ट प्रयोगशील “आदर्श शेतकरी” यांचा सत्कार श्री.शालिग्राम भगत, माजी सैनिक तसेच नवनियुक्त तंटामुक्ती अध्यक्ष श्री.शिवराम नरवाडे, माजी सैनिक श्री.रामदास पायघन,माजी सैनिक श्री.गणेश भगत यांचा कौटुंबिक सत्कार सोहळा मासरूळ येथे गावकऱ्यांच्या व भाजपा शाखेच्या वतीने करण्यात आला.

यावेळी प्रमुख पाहुणे मा.विजयराज शिंदे यांनी पंतप्रधान श्री.नरेंद्रजी मोदी यांच्या कार्याची व सक्षम नेतृत्वाचा परिचय आपल्या मनोगतातून व्यक्त केला. भाजपा तालुकाध्यक्ष ॲड.सुनिल देशमुख यांनी पंतप्रधान श्री.नरेंद्र मोदीजी यांनी गोरगरीब, कामगार, कष्टकरी व शेतकरी यांच्या साठी असलेल्या केंद्राच्या योजनांची माहिती उपस्थित गावकऱ्यांना दिली.
यावेळी विधानसभा संयोजक श्री.मंदार बाहेकर, भाजपा वैद्यकीय आघाडी तालुकाध्यक्ष श्री.डॉ.विजय काटोले, युवा मोर्चा जिल्हा सह सचिव श्री.अर्जुन लांडे पाटील, तालुकाध्यक्ष श्री.योगेश राजपूत, सरचिटणीस श्री.सतीश पाटील, श्री.जयेश धनराज पाटील पडोळ, आदींची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी कार्यक्रमाला उपस्थित असलेले श्री.नारायण लांडगे, श्री.लक्ष्मण आमले, श्री.तुकाराम खोंडे, श्री.कल्याण देशमुख, श्री.गिरिधर निकम, श्री.विठ्ठल आमले, श्री.अरुण देशमुख, श्री.सारंगधर भगत, श्री.हरिदास चिमणाजी सिनकर, श्री.गणेश अपार, श्री.सुरेश भागवत, श्री.उमेश सिनकर, श्री.देवराव कापरे, श्री.रतन कापडे, श्री.जानकीराम निकम, श्री.रमेश वाघ, श्री.विजय आमले, श्री.गजानन गुळवे, श्री.परसराम शिनकर, श्री.शंकर पवार, श्री.अनिल दांडगे, श्री.रमेश नरवाडे, श्री.दगडोबा काटोले, श्री.दामूअण्णा भागवत, श्री.प्रल्हाद अस्वार, श्री.भाऊसाहेब देशमुख, श्री.भगवान सिनकर, श्री.रामेश्वर देशमुख, श्री.बाळू निकम, श्री.कृष्णा निकम, श्री.शरद देशमुख, श्री.संतोष पालकर पाटील, श्री.संजय देशमुख, श्री.भागवत पालकर पाटील, श्री.श्रीराम देशमुख, श्री.उमेश गिरी, श्री.गौरव देशमुख, श्री.संदीप देशमुख, श्री.मुरलीधर कारंजकर, श्री.पंजाबराव कारंजकर व गावकरी मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी आ.सौ.श्वेताताई महाले पाटील, मा.आ.विजयराज शिंदे व तालुकाध्यक्ष सुनील देशमुख यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत गावातील धनगर समाजातील प्रतिष्ठित नागरिक श्री.नारायणराव सावळे, तसेच गावातील तरुण श्री.आकाश महाले, श्री.विकास महाले, श्री.रोहित महाले, श्री.राहुल महाले तसेच मोठ्या संख्येने तरुणांनी भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला.
यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तसेच आभार पंचक्रोशीतील आदर्श शिक्षक व उत्कृष्ट वक्ते मासरूळ ग्रामपंचायतीचे मा.उपसरपंच श्री.सुरेश अस्वार यांनी केले. यावेळी भारतीय जनता पक्षाचे जेष्ठ नेते माजी पंचायत समिती सदस्य बारी समाजाचे जेष्ठ नेते स्व.दादाभाऊ काटोले यांच्या मासरूळ येथील घरी मा.आ.विजयराज शिंदे यांच्या सह काटोले परिवाराची भेट दिली.






