
दुबई (Dubai) आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात चेन्नई सुपर किंग्सने (Chennai Super Kings) बॉलने पलटवार करत 20 धावांनी दुसऱ्या पर्वाच्या सुरुवातीला दणदणीत विजय मिळवला.
चेन्नईच्या विजयात रुतुराज आणि गोलंदाजांनी महत्वाची भूमिका बजावली. टॉस जिंकून फलंदाजी करणाऱ्या चेन्नईचे सुरुवातीचे फलंदाज लवकर बाद झाल्यानंतर रुतुराज गायकवाडने (Ruturaj Gaikwad) एकाकी झुंज देत संघाला 156 धावांपर्यंत मजल मारून दिली.
प्रत्युत्तरात मुंबई 20 ओव्हरमध्ये 8 विकेट्स गमावून 136 धावाच करू शकला. सौरभ तिवारी (Saurabh Tiwary) 50 धावा करून नाबाद राहिला. तर क्विंटन डी कॉक 17, अनमोलप्रीत सिंह 16 धावाच करू शकले. याशिवाय संघाचे अन्य धाकड फलंदाज दहाचा आकडाही स्पर्श करू शकले नाही. दुसरीकडे, चेन्नईसाठी ड्वेन ब्रावो (Dwayne Bravo) 3 तर दीपक चाहरने (Deepak Chahar) 2 विकेट्स घेतल्या. तसेच जोश हेजलवूड, शार्दुल ठाकूर यांनी प्रत्येकी 1 विकेट काढली.











