गुलाब चक्रीवादळानंतर आता ‘शाहीन’ या वादळाचा भारताला धोका

गुलाब चक्रीवादळामुळे (Gulab Cyclone) निर्माण झालेले कमी दाबाचे क्षेत्र सध्या गुजरात (Gujrat) किनारपट्टी, ईशान्य अरबी समुद्रावर आहे. दरम्यान आयएमडीचे (IMD) वरिष्ठ शास्त्रज्ञ आर के जेनमनी (Senior Scientist R. K. Jenmani) म्हणतात की 30 सप्टेंबरपर्यंत ते बदलेल. तसेच 1 ऑक्टोबरपासून ‘शाहीन’  (Shahin) नावाचे नवीन चक्रीवादळ तयार होईल. यासह आयएमडीने मच्छीमारांना उत्तर, मध्य अरबी समुद्र, गुजरात आणि उत्तर महाराष्ट्र किनारपट्टीवर 3 ऑक्टोबरपर्यंत न जाण्याचा इशारा दिला आहे. सध्या समोर आलेल्या माहितीनुसार शाहीन नावाचे हे नवीन चक्रीवादळ भारताच्या पश्चिम किनारपट्टीच्या किनारपट्टीवर धडकणार नाही. हे 1 ऑक्टोबर रोजी ओमानच्या दिशेने महाराष्ट्र आणि गुजरातच्या किनारपट्टीपासून दूर जाईल. परंतु यामुळे महाराष्ट्र आणि गुजरातच्या किनारपट्टी भागात मुसळधार पाऊस पडेल. म्हणजेच पावसाचा जोर काही दिवस कायम राहणार आहे.