IPL 2021: बेंगलोरचा राजस्थानवर दिमाखदार विजय

दुबई (Dubai) आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर राजस्थान रॉयल्स  (Rajasthan Royals) विरोधात विराट कोहलीच्या रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरने (Royal Challengers Bangaloer) आपला विजयीराथ सुरु ठेवला. राजस्थानने दिलेल्या 150 धावांच्या लक्ष्याच्या प्रत्युत्तरात आरसीबीने (RCB) 17.1 ओव्हरमध्ये 3 विकेट गमावून लक्ष्य गाठले. यासह विराट‘आर्मी’ने यंदाच्या आयपीएल प्लेऑफ फेरीसाठी तिकीट पक्के केले आहे. आरसीबीसाठी श्रीकर भरतने (Srikar Bharat) 44 धावा केल्या. ग्लेन मॅक्सवेलने (Glenn Maxwell) सर्वाधिक नाबाद 50 धावांचे योगदान दिले. तसेच विराट कोहलीने 25 आणि देवदत्त पडिक्क्लने 22 धावा केल्या. दुसरीकडे, या पराभवामुळे राजस्थानच्या प्लेऑफ फेरी गाठण्याच्या आशा जवळपास संपुष्टात आल्या आहेत. सजू सॅमसनच्या रॉयल्सचा 11 सामन्यातील हा सातवा पराभव ठरला आहे. राजस्थानसाठी मुस्तफिजुर रहमानने 2 विकेट घेतल्या. याशिवाय रियान परागने विराटला धावचीत करून माघारी धाडलं. आरसीबीसाठी हर्षल पटेलने 3 विकेट्स घेतल्या. तर युजवेंद्र चहल व शाहबाझ अहमद यांनी प्रत्येकी 2 विकेट घेतल्या.