IPL 2021, KKR vs PBKS: पंजाबचा धडाकेबाज विजय

कोलकाताने पहिले फलंदाजी करून दिलेल्या 166 धावांच्या लक्ष्याच्या प्रत्युत्तरात पंजाबने 19.3 ओव्हरमध्ये जबरदस्त विजय मिळवला. राहुलने पुढाकाराने नेतृत्व करत केले आणि अखेरीस 67 धावा करून परतला. राहुलने आपल्या खेळीत 52 चेंडूंचा सामना केला आणि 3 चौकार व 2 षटकार लगावले. तसेच शाहरुख खानने (Shahrukh Khan) 9 चेंडूत 22 धावा केल्या. याशिवाय मयंक अग्रवालने 40 आणि एडन मार्करमने 18 धावांचे योगदान दिले. शाहरुखने षटकार मारून संघाचा विजय निश्चित केला. या विजयासह पंजाबने प्लेऑफ शर्यतीत आपले आव्हान पल्लवित ठेवल्या आहेत.

पंजाब आता गुणतालिकेत 10 पॉईंटसह पाचव्या क्रमांकावर पोहोचला आहे. दुसरीकडे, फलंदाजांनी आव्हानात्मक धावसंख्या उभारल्यावर गोलंदाज त्याचा बचाव करून केकेआरला विजय मिळवून देऊ शकले नाही. संघासाठी वरुण चक्रवर्तीने सर्वाधिक 2 विकेट्स घेतल्या. 

यापूर्वी टॉस गमावून फलंदाजीला उतरलेल्या केकेआरसाठी सलामीवीर व्यंकटेश अय्यरने आपली शानदार लय कायम ठेवली. अय्यर आणि राहुल त्रिपाठी यांच्यात 72 धावांची भागीदारीने संघाच्या मोठ्या धावसंख्येचा पाया रचला. अय्यरने यादरम्यान आयपीएलमधील आपले दुसरे अर्धशतक पूर्ण केले. त्याने 9 चौकार आणि 1 षटकार मारला. त्याच्यानंतर कोलकाताच्या फलंदाजांना एकामागोमाग विकेट्स गमावल्या. नितीश राणाने 18 चेंडूत 31 धावा करुन विकेट गमावली. पंजाबकडून अर्शदीप सिंगने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या. तसेच रवी बिष्णोईने 2 आणि मोहम्मद शमीने 1 विकेट घेतली.