नवी दिल्ली: केंद्रीय निवडणूक आयोगाकडून सोमवारी दिल्ली विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला. त्यानुसार ८ फेब्रुवारीला विधानसभा निवडणुकीसाठी मतदान होईल. तर ११ तारखेला निवडणुकीचा निकाल जाहीर होईल. मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा यांनी दिल्लीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत यासंदर्भातील माहिती दिली. ७० मतदारसंघ असलेल्या दिल्ली विधानसभेची मुदत २२ फेब्रुवारीला संपुष्टात येत आहे. आज निवडणुकीचा...
मुलाचा वाढदिवस साजरा केला आदिवासी पाड्यातील मुलांसोबत मुंबई: मुंबईतील उपनगरात राहणारे आणि सामाजिक कार्यात नेहमीच अग्रभागी असणारे डॉक्टर दाम्पत्य डॉ गीतांजली महाडिक आणि डॉ अभिजित महाडिक यांनी त्यांच्या मुलाचा वाढदिवस अत्यंत वेगळ्या पद्धतीने साजरा केला. आपल्या मुलाच्या वाढदिवसाला वंचित व आदिवासी दुर्गम भागातील मुलांच्या चेहऱ्यावर हास्य दिसावे म्हणून त्यांनी मुलाचा वाढदिवस बोरिवलीच्या पुढे असणाऱ्या...
गुवाहाटी : भारत विरुद्ध श्रीलंका टी - २० सामना पावसामुळे अखेर रद्द करण्यात आला. दोन्ही संघांदरम्यान होणाऱ्या तीन सामन्यांच्या मालिकेतला रविवारचा हा पहिला सामना होता. गुवाहाटीतील बारसपरा मैदानात हा सामना होणार होता. सामन्याआधी नाणेफेक वेळेत झाली. भारताने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. मात्र नंतर पाऊस सुरू झाल्याने सामना सुरू होऊ शकला नाही. आजचा...
नवी दिल्ली: दिल्लीच्या जवाहरलाल नेहरू विद्यापीठात (जेएनयू) रविवारी काही गुंडांनी विद्यार्थी आणि शिक्षकांवर हल्ला चढवला. या हल्ल्यात 'जेएनयू'तील विद्यार्थी संघटनेची अध्यक्षा आइशा घोषसह अनेकजण जखमी झाले आहेत. तोंडावर मास्क लावलेल्या काही गुंडांनी काठ्या आणि विटांच्या सहाय्याने या विद्यार्थांना मारहाण केली. या हल्ल्यामागे अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचा (अभविप) हात असल्याचा आरोप जेएनयूतील विद्यार्थी संघटनेने केला आहे. जेएनयू'तील विद्यार्थ्यांनी दिलेल्या...
इंडियन अॉईल हे टेक्निशिअन अप्रेंटिस ॲण्ड ट्रेड अप्रेंटिससाठी पात्र उमेदवारांकडून अॉनलाईन अर्ज मागवित आहेत. पदाचे नाव - टेक्निशिअन अप्रेंटिस ॲण्ड ट्रेड अप्रेंटिस एकूण जागा - ३२१ पात्रता - ५० टक्के शैक्षणिक गुणांसह मॕकेनिकल/इलेक्ट्रिकल/सिव्हिल/इंस्ट्रुमेंटेशन/इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग डिप्लोमा/१२ वी उत्तीर्ण /पदवीधर/ आय.टी.आय. वयोमर्यादा - दिनांक ३० नोव्हेंबर २०१९ रोजी खुला गट...
मुंबई: लोकसभा निवडणुकीमध्ये राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप यांच्यावर जोरदार टीका केली होती. महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत राज ठाकरे यांनी शिवसेनेला लक्ष केले होते. मात्र, निवडणूक निकालानंतर शिवसेनेने भाजपशी काडीमोड घेत 'हीच ती वेळ' साधली. राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसशी हातमिळवणी करत महाविकास आघाडी सरकारची स्थापना केली. यामुळे मनसे कार्यकर्ते संभ्रमात आहेत. तर दुसरीकडे, वाडा येथे भाजपच्या बॅनरवर...
मुंबई - शेती आणि कर्जाच्या समस्येबाबत गाऱ्हाणे मांडण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची भेट घेण्याचा प्रयत्न करणारे शेतकरी आणि त्यांच्या 8 वर्षीय लहान मुलीला पोलिसांनी मातोश्री बाहेरून ताब्यात घेतले होते. देशमुख असे या शेतकऱ्याचे नाव असून, ते मुख्यमंत्र्यांची भेट घेण्यासाठी पनवेलवरून वांद्रे येथील मातोश्री येथे आले होते. मात्र, या शेतकऱ्यास पोलिसांनी सोडून द्यावे, असे आदेश मातोश्रीवरुन देण्यात आले आहेत.  देशमुख...
मुंबई: मुलुंड ते माटुंगा दरम्यान जलद मार्गावर आणि सीएसएमटी चुनाभट्टी/वांद्रे मार्गावर रविवारी मध्य रेल्वेने मेगाब्लॉक घोषित केला आहे. विक्रोळी स्थानकात पादचारी पुलाचा गर्डर टाकण्यासाठी आज, शनिवार मध्यरात्रीनंतर पाच तासांचा ब्लॉक घेण्यात येईल. पश्चिम रेल्वेवर उद्या, रविवारी कोणताही ब्लॉक असणार नाही. सोमवार-मंगळवारी वांद्रे यार्ड टर्मिनसच्या कामांसाठी ब्लॉक घेण्यात येणार असला तरी यामुळे लोकल फेऱ्यांवर कोणताही परिणाम होणार नसल्याचे पश्चिम रेल्वेने...
मुंबई: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सहा मंत्र्यांसोबत मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर ३० डिसेंबर रोजी त्यांच्या मंत्रिमंडळाचा विस्तार झाला. मात्र काही खात्यांबाबत काँग्रेसने आग्रह धरल्याने खातेवाटपाचा तिढा कायम राहिला होता. त्यामुळे सहा दिवस उलटले तरी खातेवाटप जाहीर करण्यात आलं नव्हतं. मात्र, खातेवाटप लांबत चालल्याने काँग्रेसनेच एका पाऊल मागे घेतल्याने खातेवाटपाचा तिढा सुटला. त्यानंतर काल सायंकाळी ७ वाजता राज्यपालांकडे खातेवाटपाची...
मुंबई: सामाजिक कार्यकर्ते तसेच प्रगती फाऊंडेशन या संस्थेचे सल्लागार समितीचे सदस्य व संस्थापिकिय पदाधिकारी जयवंत लोखंडे यांची काँग्रेस रोजगार व स्वयंरोजगार विभागाच्या मुंबई अध्यक्ष पदी निवड करण्यात आली आहे. मुंबई विभागीय काँग्रेस समिती मार्फत श्री जयवंत लोखंडे यांची आज रोजगार व स्वयंरोजगार अध्यक्ष...

सर्वाधिक प्रसिद्ध बातम्या