
कर्नाटक मध्ये आढळले ओमिक्रॉन चे 2 रूग्ण आढळल्याची माहिती आज केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून देण्यात आली आहे. हे परदेशातून आलेले 66 आणि 46 वर्षीय दोन पुरूष आहेत. सध्या हा व्हेरिएंट वेगाने पसरत असल्याने जगभरात चिंता व्यक्त करण्यात आली आहे. पण भारतात चिंता करण्याची गरज नाही नागरिकांनी खबरदारीची पुरेपूर काळजी घ्यावी असं आवाहन आरोग्य मंत्रालयाने केले आहे.






