
मुंबई: दत्तगरू सेवा मंडळ आणि प्रगती फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने कुर्ला पाच्छिम् तकीया वार्ड येथे मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. दत्त जयंतीच्या अनुषंगाने येणाऱ्या भाविकांच्या आणि परिसरातील नागरिकांच्या आरोग्याशी निगडित समस्यांच निराकरण करण्यासाठी सदर शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. शिबिरात फर्स्ट हेल्प चॅरिटेबल ट्रस्टच्या सहकार्याने विविध वैद्यकीय सेवा उपलब करून देण्यात आल्या होत्या. यामध्ये प्रामुख्याने सर्वसाधारण आरोग्य तासणी, हृदय विकार तपासणी, रक्तदाब तपासणी, संवेदना तपासणी, नेत्र चिकित्सा आदी सेवा मोफत उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या.

याशिवाय तज्ञ डॉक्टर मार्फत सल्ला व मार्गदर्शन करण्यात आले होते. शिबिराच्या लाभार्थींना मोती बिंदू शस्त्रक्रिया, मूत्रपिंड शस्त्रक्रिया, बायपास शस्त्रक्रिया, कर्करोग शस्त्रक्रिया, ऐंजोग्रफी व अँजिओप्लास्टी, गुडघा आणि हीप रेपलस्मेंट आदी शस्त्रक्रिया सुविधा मोफत उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या. शिबिरात कान, घसा आणि नाक समस्या व उपचार यावरही तपासणी व मार्गदर्शन करण्यात आले. शिबिरात विभागातील जवळपास दोनशेहून अधिक लोकांनी लाभ घेतला. प्रगती फौंडेशनच्या या उपक्रमाबद्दल सर्व स्तरातून कौतुक करण्यात आले..

https://drive.google.com/folderview?id=1eVz1emB7bP6RxFY3CuOAYm_BPYp-iJqt






