चिंताजनक! महाराष्ट्रात सुमारे 28 नमुने जीनोम सिक्वेन्सिंगसाठी पाठवले प्रयोगशाळेत, आरोग्य विभागाची माहिती

राज्याच्या आरोग्य विभागाने (State Department of Health) जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, महाराष्ट्र सरकारने (Maharashtra Government) 2 डिसेंबरपर्यंत 861 आंतरराष्ट्रीय प्रवाशांची (International travelers) चाचणी केली. त्यापैकी तीन सकारात्मक आहेत. गुरूवारी पॉझिटिव्ह आढळलेल्या तिघांसह अठ्ठावीस नमुने जीनोम सिक्वेन्सिंगसाठी (Genome sequencing) पाठवण्यात आले आहेत. त्यांच्या अहवालाची प्रतीक्षा आहे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. दरम्यान, गुरुवारी राज्यात 796 नवीन कोविड 19 (Covid 19) संसर्गाची नोंद झाली असून एकूण प्रकरणांची संख्या 6,637,221 वर पोहोचली आहे.

गेल्या 24 तासांत 952 बरे झाल्यामुळे सक्रिय प्रकरणांची संख्या आणखी घटून 7,209 वर आली आहे. त्यात गुरुवारी 24 बळी गेले आणि मृतांची संख्या 141,049 झाली. रायगडमध्ये सर्वाधिक 12 जणांचा मृत्यू झाला आहे. आरोग्य विभागाच्या पत्रकात म्हटले आहे की, आज सकाळपर्यंत 861 आंतरराष्ट्रीय प्रवाशांची आरटी-पीसीआर चाचणी करण्यात आली असून त्यापैकी 3 पॉझिटिव्ह आढळले आहेत. तीनही रुग्णांचे नमुने जीनोमिक सिक्वेन्सिंगसाठी पाठवण्यात आले आहेत.

याव्यतिरिक्त, 1 नोव्हेंबरपासून आलेल्या सर्व आंतरराष्ट्रीय प्रवाशांचे फील्ड निरीक्षण सुरू आहे. विमानतळ आणि फील्ड सर्व्हिलन्स या दोन्ही ठिकाणचे एकूण 28 नमुने जीनोमिक सिक्वेन्सिंगसाठी पाठवण्यात आले आहेत. यापैकी 12 एनआयव्ही पुणे आणि 16 कस्तुरबा हॉस्पिटलच्या प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहेत. 28 पैकी 25 आंतरराष्ट्रीय प्रवासी आहेत आणि तीन त्यांचे जवळचे संपर्क आहेत.