
नवी मुंबई रिक्षा चालक मालक सेवाभावी संस्था व अंकिता मोटार ट्रेनिंग स्कुल नेरूळ नवी मुंबई च्या माध्यमातून सध्याच्या परिस्थितीत आपण आपल्या आरोग्याची काळजी कशी घ्यावी व रस्त्यावर अपघात झाल्यास मदतीला धावुन कशी मदत करायची याबाबतीत (जिवनदुत ट्रेनिंग) युनायटेड संस्था मुंबई व रिक्षा चालक मालक सेवाभावी संस्था नवी मुंबई यांच्या सहाय्याने मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
शिवसेना उपनेते तथा राज्य मंत्री मा श्री विजयजी नाहटा साहेब यांच्या मार्गदर्शन खाली श्री दिलिप किसनराव आमले नवी मुंबई अध्यक्ष शिवसेना शिव वाहतूकसेवा ,शिवसेना महाराष्ट्र वाहतूकसेना नवी मुंबई सर्वच प्रमुख रिक्षा चालकाना रस्त्यावर होणारे अपघात याबाबतीत सविस्तर जिवनदुत ट्रेनिंग देऊन सर्वच रिक्षा टँक्सी चालकाना किट यामध्ये रिफल्कटर , बँटरी थर्मास,आपताकालीन हतोडा, मास्क, हातमैजे,प्रथमोचार साहित्य बॕग,सेल,शिट्टी आपतकालीन रेडियम जँकेट, तसेच सर्टिफिकेट मोफत देणेत आले आहे ..
या कार्यक्रमात डाँ विशाखा, डाँ ज्योत्सना व श्री राजेन्द हातमाने डाँक्टरानी सर्वाच्या समोर कुठल्याही चौकात अपघात होऊन काही इजा झाली तर अब्युलन्स येत पर्यत अपघात व्यक्तीवर कसे उपाय करायचं , तसेच अपघातामध्ये हाडं तुटलेल्या परिस्थितीत अपघात व्यक्तीला कसे उचलून अब्युलन्समध्ये ठेवायचे , मोटार सायकल चालकाचा हेल्मेटसह अपघात झालेस हेल्मेट कसे काढायचे इत्यादी यांचे प्रात्यक्षिक करून दाखविले .
तसेच विभागातील प्रमुख रिक्षा चालकाना जिवनदुत ट्रेनिंग देणेत आले . तसेच १०८ नबंरच्या अब्युलन्स बाबतीत माहिती दिली. याच दरम्यान व्यसन मुक्तीवर श्री दिलिप किसनराव आमले यांनी गोवा , मावा , गुटखा खाल्लेने आपल्या शरीरातील अवयव कसे कमजोर होतात , दारू पिऊन आपल्या कुटुंबाची कशी दशा होते यावार सविस्तर माहिती दिली व उपस्थिती असलेल्या कडुन मी व्यसन करणार नाही अशी प्रतिज्ञा करून घेतली .
या कार्यक्रमाचे मा सौ हेमागिनी पाटील मॕडम उप प्रादेशिक परिवहन अधिकारी नवी मुंबई यांनी या उपक्रमाचे कौतुक केले.
श्री विनय मोरे अध्यक्ष रस्ता सुरक्षा महाराष्ट्र यांच्या शुभ हस्ते ट्रेनिंग घेणाऱ्या चालकाचा सन्मान करणेत आला. कार्यक्रम आयोजक श्री दिलिप किसनराव आमले यांनी सर्वाचे पुष्प गुच्छ देऊन स्वागत केले. श्री सोपान जेजुरकर , श्री प्रमोद नांदे, श्री शंभु राजे , श्री सुनिल गाडेकर, श्री उत्तम पाटील , श्री जगन्नाथ कवडे , श्री वसत सैद, श्री अनिल निकम , श्री भिमराव शिरसाट, सौ सुनीता कापसे , श्री योगेश लोखंडे, श्री रवी सुर्वे , श्री पप्पु जैस्वाल , श्री राजु उपाध्यय , श्री धनजय औटी या सर्वानी कार्यक्रमात सहकार्य केले .
लोकमान्य टिळक समाज मंदिर हाॕल से 6 नेरूळ नवी मुंबई येथे सर्वच नियमांचे पालन करून कार्यक्रम संपन्न झाला. कार्यक्रम आयोजक आपला माणूस म्हणून परिचित असलेले श्री दिलिप किसनराव आमले जिल्हा अध्यक्ष नवी मुंबई हे होते.










