निलंबित महाराष्ट्र पोलीस अधिकारी सचिन वाझे माफीचा साक्षीदार होण्यासाठी तयार

निलंबित महाराष्ट्र पोलीस अधिकारी सचिन वाझे यांनी यांनी अंमलबजावणी संचालनालयाला (ED) पत्र लिहून, राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याविरुद्धच्या मनी लाँड्रिंग प्रकरणात माफीचा साक्षीदार होण्याची तयारी दर्शवली आहे.

बडतर्फ पोलीस अधिकारी सचिन वाझे आज चांदीवाल आयोगासमोर हजर झाले. यावेळी सचिन वाझे यांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर अनेक गंभीर आरोप केले. सचिन वाझे यांनी आयोगाला प्रतिज्ञापत्र दिले असून त्यात त्यांनी अनिल देशमुख यांनी आपल्या कुटुंबीयांना जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप केला आहे. एवढेच नाही तर अनिल देशमुखच्या सांगण्यावरून बारमधून वसुलीही केल्याचे वाझे यांनी शपथपत्रात कबूल केले. देशमुख यांनी आपणावर आणि मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्यावर खंडणीचे खोटे गुन्हे दाखल केल्याचा आरोपही वाझे यांनी केला आहे.