राज ठाकरेंना कोरोनाची लागण, उपचारासाठी लिलावती रुग्णालयात दाखल

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना कोरोनाची लागण झाली आहे. उपचारासाठी त्यांना लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

“राज ठाकरे यांना मोनोक्लोनल अँटीबॅाडी कॉकटेल दिलं जाणार आहे. त्यांना तीन तासांनी डिस्चार्ज केलं जाईल,” असं लीलावती रुग्णालयाचे डॉ. जलील पारकर यांनी सांगितलं आहे.

पारकर पुढे म्हणाले, “राज ठाकरे यांच्या आईंना डॅाक्टरांनी शुक्रवारी मोनोक्लोनल अँटीबॅाडी कॉकटेल दिलं होतं. त्यांनंतर त्यांना डिस्चार्ज करण्यात आलं आहे.”

शनिवारी (22 ऑक्टोबर) राज ठाकरेंचा कोव्हिड-19 रिपोर्ट पॅाझिटिव्ह आला आहे. पण, पालिका अधिकारी आणि मनसे नेते याबाबत अधिकृतरित्या काहीच बोलण्यास तयार नाहीत.