
भारत (India) आणि वेस्ट इंडिज (West Indies) यांच्यातील तीन सामन्यांच्या मालिकेतील शेवटचा एकदिवसीय सामना आज अहमदाबादच्या (Ahmedabad) नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळला गेला. तिसऱ्या सामन्यात भारताने वेस्ट इंडिजचा 96 धावांनी पराभव केला. तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात प्रथम फलंदाजी करताना श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) आणि रिषभ पंत (Rishabh Pant) यांनी निर्धारीत 50 संघात सर्वबाद 265 धावांपर्यंत मजल मारून दिली. प्रत्युत्तरात विंडीज संघ 37.1 षटकांत सर्व गडी गमावून 169 धावाच करू शकला. भारताचा आघाडीचा फलंदाजी क्रम पुन्हा एकदा गडगडला तर विंडीज खेळाडूंची बॅटने निराशाजनक कामगिरी सुरूच राहिली.
भारताने 96 धावांनी जोरदार विजय मिळवला आणि प्रथमच वनडे मालिकेत वेस्ट इंडिजचा क्लीन-स्वीप केला. टीम इंडिया (Team India) आणि वेस्ट इंडिज यांच्यातील ही 21 वी द्विपक्षीय वनडे मालिका आहे. यापूर्वी खेळल्या गेलेल्या 20 एकदिवसीय मालिकेत वेस्ट इंडिजने टीम इंडियाला दोनदा ‘क्लीनस्वीप’ केला आहे.
आता दोन्ही संघा 16 ते 20 फेब्रुवारी दरम्यान तीन सामन्यांची टी-20 मालिकेत कोलकाताच्या ईडन गार्डन्सवर आमनेसामने येतील











