
मुंबई: आशियातील सर्वात सर्वात मोठी व मानाचा ‘गोल्ड लेबल’ दर्जा मिळालेल्या मुंबई मॅरेथॉनला मोठ्या उत्साहात सुरुवात झाली आहे. यंदाच्या वर्षी गतवर्षीच्या तुलनेने अधिक धावापटूंनी सहभाग नोंदवला. कडकाच्या थंडीतही मोठयाप्रमाणात नागरिक सहभागी झाले होते. देश-विदेशातील नामांकित धावपटू विजेतेपद पटकावण्यासाठी सज्ज झाले असून यंदाही केनिया, इथियोपियाचे धावपटू यासाठी प्रबळ दावेदार होते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सकाळी लवकर उपस्थित राहून स्पर्धेचे उद्घाटन केले.
अनेकजण फिटनेस जोखण्यासाठी धावतात. तर, काहीजण सामाजिक संदेश देण्याच्या हेतूने स्पर्धेत सहभागी होतात. यंदाच्या मॅरेथॉनमध्ये माजी सैनिकांनी लक्ष वेधून घेतले. या माजी सैनिकांना युद्धभूमीवर पराक्रम गाजवताना अपंगत्व आले होते. युद्धभूमीवरील जखमांना विसरून जवान मॅरेथॉनमध्ये सहभागी झाले होते. पर्यावरण रक्षणाचा संदेश त्यांनी या मॅरेथॉनमध्ये दिला.

इथिओपिआच्या डेरारा हरीसाने मुंबई मॅरेथॉन स्पर्धेचा नवा रेकॉर्ड प्रस्थापित केला. मुंबई मॅरेथॉनच्या मुख्य स्पर्धेत अर्थात एलिट रनमध्ये यंदाही इथिओपिआच्या धावपटूंचं वर्चस्व; डेरारा हरीसा विजेता ठरला आहे. उत्तर प्रदेशची पारुल चौधरी प्रथम, तर मुंबई कस्टमची आरती पाटील दुसरी आणि नाशिकच्या मोनिका अथरेचा तिसरा क्रमांक पटकाविला आहे.
दरम्यान मुंबई मॅरेथॉन मध्ये एक दुःखद घटना घडली, 64 वर्षीय ज्येष्ठ नागरिकाचा हृदय विकाराच्या झटक्याने मृत्यू झाला.
मुंबई मॅरेथॉन स्पर्धेला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सह , छगन भुजबळ, आदित्य ठाकरे , जयंत पाटील, आणि बॉलीवूड स्टार टायगर श्रॉफ यानेही उपस्थिती लावली होती.











