भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार दिसणार आता लष्करी गणवेशात; धोनीची काश्मिरात नेमणूक

नवी दिल्ली: वेस्ट इंडीज दौऱ्यावर जाणाऱ्या भारतीय संघात सहभागी होणार नसून, या दरम्यान लष्करात सेवा बजावणार असल्याचं धोनीनं आधीच स्पष्ट केलं होतं. त्यानुसार लेफ्टनंट कर्नल (मानद) धोनीची लष्करानं काश्मीरमध्ये नेमणूक केली आहे. काश्मीरमधील १०६ टेरिटोरियल आर्मी बटालियनमध्ये (पॅरा) तो सहभागी होईल. ३१ जुलै ते १५ ऑगस्ट या कालावधीत तो व्हिक्टर फोर्समधील जवानांसोबत तो प्रशिक्षण घेईल. धोनी गस्त, गार्ड आणि पोस्ट ड्युटी करणार आहे.