
मुंबई: ११ वर्षांपूर्वी प्रेक्षकांना खळखळून हसवणारा ‘दे धक्का’ या चित्रपटाचा सिक्वल लवकरच मोठ्या पडद्यावर येतोय. अलीकडेच या चित्रपटाचं पोस्टर लाँच करण्यात आलं आहे.
मकरंद अनासपुरे, शिवाजी साटम, मेधा मांजरेकर आणि सिद्धार्थ जाधव हे कलाकार ‘दे धक्का २’मध्येही असणार आहेत. मात्र, त्यांच्याबरोबरीनं आणखी कोणते कलाकार असणार हे अद्याप गुलदस्त्यात आहे.
‘दे धक्का’ चित्रपटानं १० कोटींचा गल्ला जमवत मराठी सिनेसृष्टीला खराखुरा धक्का दिला होता. त्यामुळं या सुपरहिट चित्रपटाचा सिक्वल येतोय म्हटल्यावर प्रेक्षकांमध्येही या चित्रपटाबाबत उत्सुकता आहे.











