विराट कोहलीने भारताच्या टी20 संघाचे कर्णधारपद सोडण्याची घोषणा केली

विराट कोहलीने (Virat Kohli) गुरुवारी भारताच्या टी20 संघाचे कर्णधारपद (Captaincy) सोडण्याची घोषणा केली. ते म्हणाले की, संयुक्त अरब अमिराती (UAE) आणि ओमान येथे 17 ऑक्टोबर ते 14 नोव्हेंबर दरम्यान होणाऱ्या टी20 विश्वचषक 2021 (T20 Worldcup) नंतर क्रिकेटच्या सर्वात लहान स्वरुपात टीम इंडियाचे कर्णधारपद सोडू. 

हा निर्णय येताच सर्वत्र विराट कोहलीची चर्चा सुरू झाली.  बऱ्याच काळापासून अशी अटकळ बांधली जात होती. पण काही माध्यमांच्या अहवालात असेही सांगण्यात आले की कोहली तिन्ही फॉरमॅटमध्ये कर्णधार राहील. कोहलीने सोशल मीडियावर आपले विधान प्रसिद्ध करताच सर्वांना आश्चर्य वाटले कारण हा निर्णय विश्वचषकाच्या काही दिवस आधी आला आहे. 

कोहलीच्या निर्णयानंतर टी20 मधील विश्वचषकानंतर टीम इंडियाचा पुढील कर्णधार कोण असेल याविषयीही ही चर्चा तीव्र झाली आहे. यात रोहित शर्माचे नाव आघाडीवर आहे. रोहित सध्या संघाचा उपकर्णधार असून त्याने कोहलीच्या अनुपस्थितीत संघाचे कर्णधारपदही भूषवले आहे आणि यशस्वीही झाले आहे. रोहितच्या बाजूने आयपीएलचे रेकॉर्डही आहेत. त्याने 2013 मध्ये त्याच्या आयपीएल टीम मुंबई इंडियन्सचे कर्णधारपद स्वीकारले. तेव्हापासून त्याने पाच वेळा आयपीएलचे विजेतेपद मिळवले.