उत्तर प्रदेश राज्यात पुन्हा भाजपची (BJP) सरकार

उत्तर प्रदेश (Uttar Pradesh) विधानसभा निवडणुकीचे बहुतांश जागांचे निकाल जाहीर झाले आहेत. अशा परिस्थितीत आता राज्यात पुन्हा भाजपची (BJP) सरकार स्थापन होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) यांचे लखनौ (Lucknow) येथील भाजप कार्यालयात पोहोचले आणि कार्यकर्त्यांच्या मोठ्या जनसमुदायाने त्यांचे स्वागत केले. या विजयाचे उत्सव साजरे करण्यासाठी आदित्यनाथ यांनी भाजप नेत्यांसोबत आज होळी साजरी केली.