
दिल्ली (Delhi) पाठोपाठ अरविंद केजरीवाल यांची आम आदमी पार्टी (Aam Aadmi Party) आता पंजाबमध्ये (Punjab) देखील सत्ता स्थापन करणार आहे. AAP पक्षाला पंजाबमधील विजयावर हरियाणाचे (Haryana) मुख्यमंत्री आणि भाजप नेते मनोहर लाल खट्टर (Manohar Lal Khattar) यांनी शुभेच्छा दिल्या, पण दिल्ली आणि पंजाबमध्ये आम आदमी पक्ष त्याचा शेजारी असल्याने पाणी व प्रदूषणाचे प्रश्न आणखी वाढतील असे खट्टर यांनी उद्देशून म्हटले. पंजाब-हरियाणामध्ये पाण्याच्या मुद्द्यावरून आणि दिल्ली-हरियाणामध्ये पाणी पुरवठ्यावरून संघर्ष सुरू आहे.






