
आ.सौ.श्वेताताई महाले पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त भाजपा बुलडाणा तालुकाध्यक्ष ॲड.सुनिल देशमुख यांनी मासरूळ जिल्हापरिषद सर्कल मध्ये भव्य महा आरोग्य तपासणी शिबीर व सर्व आजारावरील मोफत शस्त्रक्रिया मार्गदर्शन शिबीर गुम्मी येथे आयोजित करण्या आले होते.
तपासणी शिबिराचा 307 रुग्णांनी लाभ घेतला. यावेळी आ.सौ.श्वेताताई महाले पाटील, मा.आ.विजयराज शिंदे व भाजपा तालुकाध्यक्ष ॲड.सुनिल देशमुख यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत शिवसेनेच्या वैद्यकीय आघाडी उप तालूका प्रमुख श्री.डॉ.योगेश नरोटे, रवी बोरकर व सहकाऱ्यांनी भाजपा मध्ये जाहीर प्रवेश केला.
शिबिरामध्ये स्वयम फाऊंडेशन, बुलडाणा यांच्या सहकाऱ्यांच्या सोबतच गोदावरी फाऊंडेशन, जळगाव येथून आलेल्या दीपक पाटील, तुषार सुरे, डॉ.सुनील, डॉ.श्रेयश, डॉ.प्रियांका, डॉ.शिखा यांनी मासरूळ जिल्हापरिषद सर्कल मधील रुग्णांची तपासणी करून योग्यते मार्गदर्शन केले.
तसेच भाजपा बुलडाणा तालुक्याच्या वतीने आ.सौ.श्वेताताई महाले यांचा वाढदिवस केक कापून साजरा करण्यात आला.

या वेळी भाजपा जिल्हाउपाध्यक्ष देवीदास पाटील जाधव, प्रकाश पडोळ, दत्ता पाटील, माजी तालुकाध्यक्ष तेजराव पाटील धंदर, जेष्ठ नेते उत्तमराव नरोटे, फकिरा नरोटे, साहेबराव नरोटे, विश्वासराव देशमुख, नारायण पाटील धंदर, भोजराज पाटील, शालिग्राम कानडजे, युवा मोर्चा तालुकाध्यक्ष योगेश राजपूत, ओबीसी मोर्चा तालुकाध्यक्ष अनिल जाधव पाटील, व्यापारी आघाडी तालुकाध्यक्ष किरण पाटील धंदर, भाजपा तालूका उपाध्यक्ष गजानन जाधव पाटील, देवेंद्र पायघन, चिटणीस अरुण भोंडे, पुरुषोत्तम भोंडे, रवी धनावत, प्रकाश दांडगे, अनिल उबाळे, रवी काळे, समाधान पाटील धंदर, दीनानाथ राजगुरे, राजाराम पिंपळे, गणेश बारवाल, शाम राजपूत, सुभाष राजपूत, दशरथसिंग राजपूत, श्रीरंग पवार, हरिभाऊ उबाळे, शरद देशमुख, संजय झुंबड, अनिल गुळवे, अर्जुन लांडे, रामेश्वर आल्हाट, संतोष भगत, राजू अपार, सुभाष कदम, फिरोज बेग, तेजराव पाटील जाधव, सुनील जाधव, विठ्ठल नरोटे, सूर्यदेव काकडे, पंजाब हटकर, पंडित नरोटे, दिनकर नरोटे, शेख सादिक, मोईन पठाण, संतोष पालकर, भागवत पालकर, गजानन जाधव, नाना जाधव, दिलीप सुरडकर, सतीश पाटील, पवन बुधवत, सोपान जगताप, डॉ.गजानन देवकर, रमेश भोपळे, सागर पवार पाटील, दिलीप सुरडकर, समाधान आघाव, संजय चांदा, गोपाल राजपूत, गोपाल तायडे, मधुकर गायकवाड, गजानन गायके, शेषराव कासोद, हिम्मत भांबेरे, शेख सादिक, शेख शौकत, अरुण भोंडे, अभिषेक वायकोस तसेच सर्कल मधील भाजपा पदाधिकारी,कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.







