अन्वय अभिलेश दंडवते याचे सैनिक स्कूल प्रवेश परीक्षेत यश….राज्यातून दुसरा

कु. अन्वय अभिलेश दंडवते राहणार नवी मुंबई या विद्यार्थ्यांची अखिल भारतीय सैनिक स्कूल प्रवेश परीक्षेत निवड झाली आहे सैनिक स्कूल हे भारतात 33 ठिकाणी आहेत. सैनिक स्कूल हे सैनिक स्कूल सोसायटी तर्फे चालविले जातात. समाजातील सर्व स्तरातील व देशाच्या सर्व भागातील लोकांना सैन्यदलात अधिकारी होता यावे म्हणून भारत सरकारने संरक्षण खात्याच्या अधिपत्याखाली देशाच्या निरनिराळ्या भागात नॅशनल डिफेन्स अकॅडमी प्रवेश परीक्षेची तयारी करून घेणाऱ्या संस्था काढावयाचे ठरविले. या 33 शाळांवर केंद्रीय संरक्षण खात्याचे प्रशासनिक नियंत्रण असते सैनिक स्कूल ची स्थापना विशिष्ट उद्दिष्ट एनडीए प्रवेश व सैन्यदलात अधिकारी ठेवून झालेली असल्यामुळे आणि ते उद्दिष्ट साध्य करण्याच्या दृष्टीने शाळा चालवली जात असल्याने येथील सर्व विद्यार्थी इतर शाळातील विद्यार्थ्यांन पेक्षा वरचढ असतात.

सैनिक स्कूल शाळा आपल्या महाराष्ट्रात दोन ठिकाणी आहेत 1. सातारा 2. चंद्रपुर सैनिक स्कूल मध्ये प्रवेश घेण्यासाठी ऑल इंडिया सैनिक स्कूल एन्ट्रान्स एक्झाम द्यावी लागते ती एक्साम नॅशनल टेस्टिंग एजन्सी घेते इयत्ता सहावी व नववी साठी प्रवेश घेण्यासाठी ही परीक्षा द्यावी लागते.

6 वी ची परीक्षा देण्यासाठी 300 मार्क चा पेपर विद्यार्थ्यांना दोन तास तीस मिनिटे मध्ये सोडवायचा असतो त्यामध्ये mathematics, इंटलीजन्स, gk व इंग्लिश हे विषय असतात विद्यार्थी वर्षभर परीक्षेची तयारी करतात. आम्ही अन्वय ला अधिकारी बनवण्याच्या दृष्टीने सैनिक स्कूल प्रवेश परीक्षेला बसण्याची तयारी सुरू केली त्यासाठी आम्हाला आय कॅन ट्रेनिंग इन्स्टिट्यूट माहिती मिळाली. आम्ही त्यांच्या माध्यमातून ऑनलाईन क्लासेस चालू केले व नंतर 2.5 महिने तळेगाव दाभाडे पुणे येथे त्यास तयारी करण्यासाठी पाठविले या परीक्षेसाठी महाराष्ट्रातून दरवर्षी दहा ते पंधरा हजार (देशभरातून दोन लाखापेक्षा जास्त )मुले व मुली बसतात या सर्व मुलांमधून अन्वय ची निवड चंद्रपुर सैनिक स्कूल येथे प्रवेश घेण्यासाठी झाली. या परीक्षेसाठी खूप मेहनत करावी लागते कारण जे मुलं आठवी व नववी मध्ये शिकतात ते या परीक्षेला चौथी व पाचवी च्या मुलांना सोडावावे लागते अन्वय ने तळेगाव ला असताना 12 ते 14 तास अभ्यास केला जवळजवळ 100 पेक्षा जास्त पेपरची प्रॅक्टिस त्याने केली होती. आज आय कॅन ट्रैनिंग इन्स्टिटयूट (देशमुख सर, गजानन गोरे सर ) व अन्वय ची मेहनत यामुळे तो परीक्षेत अंतिम निवड यादीतून राज्यात दुसरा येऊ शकला.