
ज्येष्ठ अभिनेते राजीव कपूर यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं. ते 58 वर्षांचे होते. राजीव कपूर यांचे मोठे भाऊ रणधीर कपूर यांनी ही माहिती दिली.
राजीव कपूर हे रणधीर कपूर आणि ऋषी कपूर यांचे लहान भाऊ होते. राजीव कपूर यांनी त्यांचे वडील राज कपूर निर्मित राम तेरी गंगा मैली हो गई या हिंदी चित्रपटातून पदार्पण केले होते.







