लोकलवर दगडफेक, गार्ड गंभीर जखमी

मुंबई: पनवेलहून सीएसएमटीकडे निघालेलेली हार्बर मार्गावरील लोकल वाशीहून निघाल्यानंतर मानखुर्द स्थानकाजवळ येताच लोकलवर दगडफेक करण्यात आली. दगड फेकण्यात आले तेव्हा लोकल वेगात असल्याने लोकलवक फेकलेले दगड शेवटच्या डब्यावर धडकले. यातील काही दगड मोटरमॅनच्या केबिनमध्येही गेले. केबिनमध्ये असलेला लोकलगार्ड या दगडफेकीत जखमी झाला. लोकलगार्डच्या डोक्याला यातील दगड लागल्याने गार्ड रक्तबंबाळ झाला.

या प्रकरणी अज्ञातांविरोधात वाशी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास घडली.