विवेक ओबेरॉयच अजब एक्सिट पोल, ऐश्वर्या रायला टार्गेट

मुंबई : विवेक ओबेरॉय याने एक्सिट पोलवर टिप्पणी करताना ऐश्वर्या राय वर ट्विट करत आक्षेपार्ह पोस्ट केली. त्यात त्याने ओपिनियन पोल असं लिहून सलमान खान व ऐश्वर्या राय यांचा फोटो टाकला, एक्सिट पोल असं लिहून ऐश्वर्या राय व स्वतः चा फोटो टाकला आणि शेवटी रिझल्ट असं लिहून अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय यांचा फोटो टाकला आहे. विवेकच्या या कृतीने समाजाच्या सर्व स्तरातून टीका होत आहे. निर्माते मधुर भांडारकर, अभिनेत्री सोनम, अभिनेत्री उर्मिला मातोंडकर आदींनी विवेकच्या या कृतीचा निषेध व्यक्त करून सडाडून टीका करण्यात आली. दरम्यानच्या काळात राज्य महिला आयोगाने विवेक ओबेरॉय याला कायदेशीर नोटीस बजावली आहे.