
अमेरिका…..आजची एक जागतिक महासत्ता
11सप्टेबंर 1492 मध्ये स्पेन वरून ख्रिस्तोफर कोलंबस समुद्र मार्गे भारताच्या शोधार्थ निघाला पण मार्ग भरकटत जगाला अज्ञात असलेल्या अमेरिकन भूमीवर पोचला.

या खंडात सब्रियन मंगोलियन वंशाचे लोक ज्यांना रेड इंडियन संबोधनात आले.कोलंबसने तीन वेळेस अमेरिकेची सागरी सफर केली.रेड इंडियन्सना कपटाने फसवणूक करून स्पेनच्या राणी पुढे अमेरिकाच शोध लावला हा पुरावा दाखविण्यात साठी राणी पुढे सादर केले.राणीला त्यांची दया येऊन त्यांना मुळ भूमीत सोडण्याचे आदेश दिले.
या नवीन खंडाची युरोपियन देशांना माहिती झाल्यावर सर्वानीच तिकडे धाव घेऊन आप आपल्या वसाहती स्थापन केल्या मात्र यावर ब्रिटनचा वर्चस्व होते.शेवटी ब्रिटनची वाढती लालसा,जाचक करांना कंटाळून सुरुवातीला या तेरा वसाहती एकत्र येऊन स्वातंत्र्याचे रणशिंग फुंकले आणि 4 जुलै 1776 रोजी स्वतंत्र संयुक्त अमेरिका अस्तित्वात आली. आज ती एक जागतिक शक्तिमान अध्यक्षीय लोकशाही देश असलेली महासत्ता बनलीङ आहे.त्याची आर्थिक व लष्करी बलशाली ताकदीवर संयुक्त राष्ट्र सुरुक्षा समितीत सदस्यता असून तिला व्हेटोचा अधिकार मिळाला आहे.
अमेरिकेचे शेजारी कॅनडा,मेक्सिको देश असून सागरी सीमा कॅनडा,बहामास आणि रशियाला लागून आहेत. अमेरिकेन राज्य संस्था फेडरेशन स्वरूपाची असून एकूण पन्नास राज्यांचा समावेश आहे.वाॅश्गिटन डी.सी.ही राजधानी आहे.व्हाईट हाऊस हे अमेरिकेन राष्ट्राध्यक्षांचे अधिकृत निवासस्थान आहे.
अमेरिकेच्या राष्ट्रीय प्रशासकीय रचनेत ससंद,अध्यक्ष व न्याय ह्या तीन शाखा सत्तेचा समतोल राखीत असतात. अध्यक्ष पदाची मुदत चार वर्ष असून फक्त दोन टर्म अध्यक्ष पदी राहाता येते.
जगभरातील लोक या बलशाली देशात आपले नशीब अजमवण्या साठी येत असतात.विस्तृत भूमी,सागरागत प्रचंड गोड्या पाण्याच्या नद्यां,सरोवरे,सुपीक भूमी यामुळेच अमेरिकेतील वैभवाची चढती कमान आपणांस नेहमीच दिसून येते.
या अमेरिकेन जनतेची काही रोचक आणि गमतीशीर तथ्ये आपणा बरोबर शेअर करीत आहे.अमेरिकेत वाबाश आणि इंडीयाना मध्ये प्रथम विजेचा वापर करण्यात आला.अमेरिकेन लोकांचे श्वान प्रेम सर्वश्रुत आहे.एका सर्वेक्षणानुसार अमेरिकेत 5 करोड 26 लाख कुत्रे आहेत.येथे दरसेंकदाला एक घर आगीचे भक्ष्य ठरते .
अमेरिकेन लोक कागदाचा वापर सर्वाधिक म्हणजे 8 करोड 50 लाख टन कागद दरवर्षी स्वच्छतागृहापासून किचन मध्ये सर्वत्रच वापरत असतात. 1950 नंतरच्या सर्वेक्षणानुसार 40% बालकांचा जन्म अविवाहित मात्यापित्या पासून होतो ही वस्तुस्थिती स्पष्ट झाली आहे.
न्यूयॉर्क सर्वात लोकसंख्येचे शहर तर दुसर्या क्रमांकावर लाॅस एंजेल्सीस आणि तिसऱ्या स्थानावर शिकागोचा नबंर लागतो.अटलांटा हे सर्वात मोठे आंतरराष्ट्रीय व्यस्त विमानतळ असून दर सेकंदाला येथून आकाशात विमान आकाशात झेप घेत असते.
आज भारतीयांचा अमेरिकेत टक्का चांगलाच आहे.आपल्या भारतीयांनी बुध्दीमत्तेच्या जोरावर सर्वच क्षेत्रात मानाचे आणि अभिमानास्पद कामगिरी बजावली आहे मात्र 1924 पर्यंत भारतीयांना नागरिकत्व घेण्याचा अधिकार मिळत नव्हता.आणि अद्यापही अमेरिकेत महिला राष्ट्राध्यक्ष पदापर्यंत पोचलेली नाही.
आता येथेच थांबतो आणि भारतीय स्वातंत्र्य अमृत महोत्सवी दिनाच्या कोटी कोटी शुभेच्छा देऊन आपली रजा घेतो.जयहिंद, भारत मातेला सादर प्रणाम!
डाॅ.भास्कर धाटावकर, निवृत्त पुराभिलेख संचालक, महाराष्ट्र शासन











