मला भावलेला शांतताप्रिय कॅनडा : डॉ भास्कर धाटावकर यांच्या नजरेतून भाग – 23 (मिसीसागाचा निरोप घेऊन प्रयाण शिकागो कडे – भाग 3)

मिसीसागाचा निरोप घेऊन प्रयाण शिकागो कडे

पहाटेच जाग आली.हाॅटेलच्या तळमजल्यावरील प्रशस्त स्विमिंग पूल मध्ये अनेक जण पोहण्याचा आनंद घेत होते.मी मित्रमंडळींबरोबर वाॅटस्अपच्या माध्यमातून संपर्क साधून अपडेट देत होतो.चेक आऊट करून जवळच्याच कॅफेटेरियात आम्ही ब्रेकफास्ट उरकून पुढील प्रवासा साठी मार्गस्थ झालो.

राहुल कडून मी माहिती घेतच होतो.डेट्रराईड शहर काही वर्षांपूर्वी कोल उद्योगाला प्रमोट करण्या करीता सोयी सुविधा देण्याचे ठरविण्यात आले पण अपेक्षित यश मिळाले नाही.आता पुन्हा नव्याने प्रकल्प, योजना आणले जात आहेत.

मिशीगण स्टेटची हद्दीतील एका इंग्लिश प्रकारच्या पदार्थाचा अनुभव घेण्यासाठी आम्ही एका मोठ्या रेस्टॉरंट मध्ये लंच घेऊन इंडीयाना राज्यातून आम्ही जात होतो.रस्ते अप्रतिम हिरवीगार वनराजी, कम्फर्ट ब्रेकची , मेडिकल ,वाॅक इन क्लिनिक सहित,पेट्रोल पंप इत्यादी सुविधा उपलब्ध असतात. जोडीला अमेरिकेन वैभव जाणवत होतेच.इंडीयाना संपून आम्ही मिशीगण लेक कुच करीत होतो.

कॅनडातील ऑटोंरिया लेक जसा सुप्रसिद्ध आहे तसाच हा गोड्या पाण्याचा क्षितिज न दिसणारा ऑटोंरिया लेकच्या खालोखाल असा लेक आहे आणि येथेही लाखो पर्यटक भेट देत असतात. आम्हा मिसीसागाहून शिकागोला 900 k m अतंर पार करावयास किमान कम्फर्ट ब्रेक धरून नऊ तास लागले असते.पारूल आणि राहुल दोघेही दोन कार्स चालवित होते.एका कारमध्ये चौघेजण! लकी मात्र राहुलच्या कारमध्ये.राहुल आणि पारूल वाॅकीटाकी वरून एकमेकासी समन्वय ठेवून होतेच.उषा अनेक प्रश्न विचारून माहिती घेतच होती.

मिशीगण लेकवर विकएंड असल्याने प्रचंड गर्दी होती.सर्वात अडचण म्हणजे पार्किंगची.येथे पार्किंग मिळाली कि तेथील ठेवण्यात आलेल्या मशीन मध्ये पार्किंग फीज भरावी लागते.तासाचे दरा प्रमाणे तुम्ही किती तास थांबणार तशी फीज भरावी लागते.

मिशीगण लेक मध्ये लोक जलविहार,जलस्पोर्टस् इत्यादीचा आनंद घेत होते.राहुल, अवनी,नीवानी भरपूर आनंद लुटला.त्यानंतर उंच उंच फाउटंन ,कारंजे संगीताच्या तालावर उडवित चिंब न्हावून काढणारे फवाराचे आनंद घेऊन डाॅमिनोज मधून पिझ्झाचा आस्वाद घेऊन शिकागोत प्रवेश करण्यासाठी अंतीम टप्प्यातील प्रवासास सुरुवात केली.आता आम्ही शिकागो पासून फक्त दिड तासाच्या अंतरावर होतो.

अखेर प्रवासाची सांगता होत आली.शिकागोत आपले स्वागत असो ( मी इंग्लिश मधील मजकूराचे मायबोलीत स्वैर अनुवाद करण्याचे स्वातंत्र्य घेत आहे.मराठी माणूस आहे ) नेत्रदीपक रोषणाई, उचंच उंच इमारती,पेट्रा,लोकलचे,जाळे ,आणि शिकागोतील सर्वात उंच निलोज टॉवर्स! मन रोमांचित झाले होते.तशी ही माझी अमेरिकेतील तिसरी व्हिजीट आहे.अमेरिका प्रचंड महाकाय आहे.तरीही बर्‍यापैकी महत्त्वाचे प्रमुख शहरांना भेटीही दिल्या आहेत. तरीही अमेरिकेचे मनावरील गारूड काही कमी होत नाही.

आम्ही राहुलच्या कॅलेंडर लेन, बफेलो ग्र्यु या निवासस्थानी सुखरूप पोचलो.हजार किलोमीटरचा जवळपास प्रवास झाला होता.अब्राहम लिंकन यांची जन्म भूमी असलेल्या राज्यात आणि हिंदु धर्माचे तत्वज्ञान जगाला ज्ञात करून देण्याचे महान कार्य स्वामी विवेकानंद यांनी 1893 साली ज्या शिकागो सीटीमध्ये केले होते तेथे मी पोचलो आहे.अतीव आनंद झाला आहे.

डाॅ.भास्कर धाटावकर, निवृत्त पुराभिलेख संचालक, महाराष्ट्र शासन