
वसई विरार शहर मनपाचे उपायुक्त श्री गवस यांच्याशी प्रभागातील सार्वजनिक समस्यांबाबत भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते यांची चर्चा
विरार / दि. २६ ऑगस्ट : भारतीय जनता पार्टी वसई विरार जिल्हा उपाध्यक्ष श्री जितेंद्र पाटील यांच्या अध्यक्षतेखाली दि. २६ ऑगस्ट २०२२ रोजी वसई विरार मनपाच्या विरार येथील मुख्य कार्यालयात मनपाचे उपायुक्त श्री गवस यांच्याशी प्रभागातील सार्वजनिक समस्यांबाबत चर्चा करण्यात आली. त्यावेळेस प्रत्येक प्रभागातील कनिष्ठ अभियंता व त्यांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

त्या समस्यांमध्ये महत्त्वाचा विषय म्हणजे रस्त्यावरील खड्डे व हे खड्डे बुजविण्यासाठी अपयशी ठरलेल्या कनिष्ठ अभियंता व अधिकारी यांना निलंबित करण्याची मागणी करण्यात आली.श्री.गवस उपायुक्त वविशमनपा यांनी हे रस्ते मंगळवार, दि.३० ऑगस्ट २०२२ रोजी पर्यंत खड्डेमुक्त करण्याचे आश्वासन दिले आहे.जर हे काम दिलेल्या वेळेत झाले नाही तर सार्वजनिक बांधकाम मंत्री श्री.रविंद्रजी चव्हाण यांच्याकडे आंदोलनास बसण्याची तयारी भारतीय जनता पार्टीचे वसई विरार जिल्हा उपाध्यक्ष श्री.जितेंद्र पाटील यांनी सांगितले.
यावेळी त्यांच्यासोबत वसई विरार जिल्हा सचिव बिजेंद्र कुमार, अशोक यादव, नालासोपारा शहर मंडळ उपाध्यक्ष निरव शुक्ल, नालासोपारा शहर ओबीसी मोर्चा अध्यक्ष सुहास पांचाळ, वसई पूर्व मंडळ सरचिटणीस सूर्यकांत वाघमारे, राकेश कदम मा.बुथप्रमुख, नालासोपारा शहर व कार्यकर्ते उपस्थित होते.






