
वसई विरार शहर मनपाचे उपायुक्त श्री गवस यांच्या दालनासमोर वसई तालुक्याच्या सार्वजनिक समस्यांबाबत भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते यांचे आंदोलन
विरार / दि. ०७.०९.२२ : भारतीय जनता पार्टी वसई विरार जिल्हा उपाध्यक्ष श्री जितेंद्र पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आज दि. ७ सप्टेंबर २०२२ रोजी वसई विरार मनपाच्या विरार येथील मुख्य कार्यालयात मनपाचे उपायुक्त श्री गवस यांच्याशी वसई तालुक्यातील सार्वजनिक समस्यांबाबत चर्चा करण्यात आली होती. त्यावेळेस श्री.गवस उपायुक्त वविशमनपा यांनी हे रस्ते मंगळवार, दि.३० ऑगस्ट २०२२ रोजी पर्यंत खड्डेमुक्त करण्याचे आश्वासन दिले होते ; परंतु आजतागायत हे रस्ते अर्धवट स्वरूपात करण्यात आले तसेच उपायुक्त गवस यांनी दिलेल्या आश्वासनाची कोणतीही पूर्तता करण्यात आलेली नाही.
त्यांच्या या बेजबाबदार कृत्यामुळे उपायुक्त गवस यांच्या दालनासमोर बसून आंदोलन करण्यात आले. यावेळेस भारतीय जनता पार्टीचे वसई विरार शहर जिल्हा उपाध्यक्ष श्री.जितेंद्र पाटील यांच्या सोबत वसई विरार शहर जिल्हा सचिव – बिजेंद्र कुमार, युवा – सरचिटणीस महाराष्ट्र प्रदेश (भटके विमुक्त आघाडी) – श्री. अशोक शेळके, वसई विरार शहर जिल्हा युवा मोर्चा सचिव – श्री अपेक्षित देशमुख, नालासोपारा शहर मंडळ उपाध्यक्ष – निरव शुक्ल, श्री प्रविण देवधर आणि मा.बुथप्रमुख नालासोपारा – राकेश कदम उपस्थित होते.






