रवी दहियाच्या हातून निसटला ‘गोल्डन’ चांस, रशियन जगज्जेत्याने अंतिम सामन्यात 7-4 ने दिला धोबीपछाड; कुस्ती कांस्यपदक निसटले, शेवटच्या काही सेकंदात Deepak Punia ने सामना गमावला

23 वर्षीय भारतीय कुस्तीपटू रवी कुमार दहियाने टोकियो ऑलिम्पिक खेळात चमकदार कामगिरी केली. हरियाणाच्या रवीने 57 किलो कुस्ती प्रकारात देशासाठी रौप्य पदक पटकावले.

रवीला रशियन पैलवानकडून 7-4 अशा फरकाने पराभवाचे तोंड पाहावे लागले आणि यासह कुश्ती खेळात भारताचे पहिले सुवर्ण पदक पटकावण्याचे त्याचे स्वप्न भंग झाले. ऑलिम्पिक कुश्ती खेळात भारताचे हे सहावे पदक ठरले. यापूर्वी खाशाबा जाधव, सुशील कुमार, योगेश्वर दत्त आणि साक्षी मलिक यांनी या खेळात भारताला पदक जिंकून दिले होते. साक्षी आणि योगेश्वर यांच्याकडे कांस्य पदक जिंकले आहेत.

टोकियो ऑलिम्पिक (Tokyo Olympics) खेळात 87 किलो फ्रीस्टाईल कुस्ती सामन्यात सॅन मारिनोच्या (San Marino) कुस्तीपटूने 2-4 ने पराभूत करत भारतीय कुस्तीपटू दीपक पुनियाचे  (Deepak Punia) टोकियो ऑलिम्पिक 2020 मध्ये कांस्यपदक जिंकण्याचे स्वप्न भंग केले. सुरुवातीला आघाडी घेऊनही दीपकने सामना 2-4 असा गमावला. बुधवारी उपांत्य फेरीत दीपक अमेरिकेच्या डेविड टेलरकडून पराभव पत्करावा लागला होता, पण दीपकला कांस्य पदक  (Bronze Medal) मिळण्याची अपेक्षा होती. मात्र, आता या पराभवामुळे त्याला आता रिकाम्या हाती मायदेशी परतावे लागणार आहे.

भारतीय कुस्तीपटू रवी दहियाने (Ravi Dahiya) 57 किलो वजनी गटात रौप्य पदक पटकावले आहे. मात्र, तो सुवर्णपदक जिंकू शकला नाही आणि इतिहास रचण्यापासून चुकला. अंतिम सामन्यात रशियन कुस्तीपटूने त्याला पराभवाची धूळ चारली. हरियाणा सरकारने (Haryana Government) गुरुवारी टोकियो ऑलिम्पिक (Tokyo Olympics) 2020 रौप्यपदक विजेता रवी कुमार दहिया याला चार कोटी रुपये आणि वर्ग 1 श्रेणीतील नोकरी देण्याची घोषणा केली. तसेच त्याला हरियाणामध्ये जिथे पाहिजे तिथे 50% सवलत देऊन भूखंड दिला जाईल जिथे कुस्तीसाठी एक इनडोअर स्टेडियम त्याच्या गावी नहरी येथे बांधण्यात येईल, अशा बक्षिसांचा पाऊसच हरयाणा सरकारने आपल्या वीरपुत्रावर केला. भारताने टोकियो क्रीडा स्पर्धेत आपले दुसरे रौप्य पदक मिळवले. यापूर्वी, भारोत्तोलक मीराबाई चानूने महिलांच्या 49 किलो गटात दुसरे स्थान पटकावले होते.

भारतीय कुस्तीपटू विनेश फोगटचा 53 किलो फ्रीस्टाइलच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश

टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारतीय कुस्तीपटू विनेश फोगटने तिच्या पहिल्या फेरीत विजय मिळवल्यानंतर आता महिलांच्या 53 किलो फ्रीस्टाइलच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे. तिने सोफिया मॅग्डालेनावर 7-1 अशी मात केली आहे.