राज ठाकरे ममताच्या भेटीला

कोलकता: मोदी सरकार सत्तेत आल्यानंतर सर्वच राजकीय पक्षांनी ईव्हीएम मशीन विरुद्ध आवाज उठवला होता. ईव्हीएम डावलून परत जुन्याच पध्दतीने बॅलेट (मतपत्रिका) पेपर वर मतदान घ्यावे अशी मागणी विरोधी पक्षात जोर पकडू लागली आहे.

राज ठाकरे यांनी याच मागणीसाठी काही दिवसांपूर्वी नवी दिल्लीत निवडणूक आयुक्तांची भेट घेतली होती. त्याचवेळी ते सोनिया गांधी यांनाही भेटले होते. येत्या ९ ऑगस्ट रोजी विविध पक्ष व संघटना देशभरात ईव्हीएमविरोधात मोर्चा काढणार आहेत. त्यात राज ठाकरे सहभागी होणार आहेत. याच पार्श्वभूमीवर ते ममतांची भेट घेणार असल्याचं समजतं.