रायगड जिल्ह्यात सतर्कतेचा इशारा

३ जूनला ‘जनता कर्फ्यू’ पाळण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

कोकण किनारपट्टीवर कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने त्याचे ‘निसर्ग’ चक्रीवादळात रुपांतर होण्याची शक्यता असून येत्या ४८ तासात हे वादळ रायगड जिल्ह्यातील किनारपट्टीवरील भागात धडकण्याची शक्यता आहे.

या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

मच्छिमारांना खोल समुद्रात जाण्यास मनाई करण्यात आली आहे.

बचाव पथके तैनात करण्यात आली आहेत.

तसेच ३ जूनला घरातच राहून जनता कर्फ्यू पाळण्याचे आवाहन जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी केले आहे.