विक्रम गोखले यांच्या कुटुंबीयांसह त्यांच्या चाहत्यांसाठी दिलासा देणारी बातमी

ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांची प्रकृती चिंताजनक असल्याची बातमी समोर आली होती. त्यांच्यावर पुणे येथील दीनानाथ मंगेशकर रूग्णायलात उपचार सुरू आहेत. आता विक्रम गोखले यांच्या कुटुंबीयांसह त्यांच्या चाहत्यांसाठी दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. गोखले यांच्या प्रकृतीत सुधारणा होत असून ते उपचारांना सकारात्मक प्रतिसाद देत असल्याचे रूग्णालयाचे जनसंपर्क अधिकारी शिरीष याडगीकर यांनी पत्रकार परिषदेत सांगितले आहे. रुग्णालयाचे जनसंपर्क अधिकारी शिरीष याडगीकर यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितलं की, ‘विक्रम गोखले यांच्या प्रकृतीत आश्वासक सुधारणा होत आहे. ते उपचारांना प्रतिसाद देत असून त्यांनी डोळे उघडले आणि हात- पायही हलवले. तसेच पुढील ४८ तासात त्यांचा व्हेंटिलेटर सपोर्ट काढण्यात येईल.

तसेच त्यांचा रक्तदाब आणि हृदयाची क्रिया स्थिर आहे.’ दरम्यान, गोखले यांच्यावर क्रिटिकल केअर यूनिटमध्ये उपचार केले जात आहेत. ५ नोव्हेंबर रोजी विक्रम गोखले यांची तब्येत खालावल्याने त्यांना रुग्णालयात भरती करण्यात आले. त्यानंतर बुधवार दि २३ रोजी रात्रीपर्यंत त्यांच्या निधनाची अफवा वणव्यासारखी सोशल मीडियावर पसरली. त्यानंतर अभिनेत्याच्या पत्नी वृषाली यांनी माहिती देत हे वृत्त फेटाळून लावले. त्यांच्या मुलीनेही विक्रम गोखलेंची तब्येत चिंताजनक असल्याचे व उपचार सुरू असल्याचे म्हटले. गोखले यांचे कौटुंबिक मित्र राजेश यांनी दिलेल्या माहितीनुसार विक्रम गोखले यांचे अनेक अवयव निकामी झाले आहेत.याडगीकर यांनी गोखले यांचा मेडिकल रिपोर्ट सोशल मीडियावर शेअर केला आहे. त्यामध्ये त्यांची तब्येत सुधरल्याचे सांगितले असून त्यांनी डोळेही उघडले आहेत आणि हातपायांची हालचालही केली आहे. त्याशिवाय त्यांचा बीपीदेखिल नॉर्मल झाला आहे. 48 तासानंतर वेंटीलेटरही काढण्याची शक्यता सांगितली आहे. अशी माहिती डॉक्टरांनी रिपोर्टमध्ये सांगितली आहे.