
ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांच्या निधनाचे वृत्त काल (दि.२३) रात्री पासून येत आहे. मात्र त्यांच्या कुटूंबिंयाकडून निधनाचे वृताबाबत नकार देण्यात आला आहे. तर दिनानाथ मंगेशकर रुग्णालय प्रशासनाने अद्याप याची पुष्टी केलेली नाही. तसेच रुग्णालय प्रशासनाकडून अजून याची अधिकृत घोषणा केलेली नाही. या संदर्भात आज सकाळी ९.३० च्या दरम्यान रुग्णालय प्रशासनाकडून माहिती देण्यात येईल.
पीटीआयच्या वृत्तानुसार, दिनानाथ मंगेशकर रुग्णालयात त्यांच्यावर गेल्या 15 दिवसांपासून उपचार सुरु होते. बुधवारी त्यांची प्रकृती खालावली होती. यानंतर उपचारांना ते प्रतिसाद देणे थांबवले होते. त्यानंतर काल रात्रीपासून गोखले यांच्या निधनाचे वृत्त सगळीकडे पसरत आहे. डॉक्टरांना याबाबत विचारले असता त्यांनी अधिक माहिती देण्यास नकार दिला. तसेच गोखले कुटुंबीयांचे सदस्य याबाबत माहिती देतील, असे त्यांनी सांगितले. या वृत्तामुळे अनेक सिनेसृष्टीतील कलाकरांनी त्यांना सोशल मीडियावरून श्रद्धांजलीही वाहिली.
आमच्या न्यूज पोर्टलवर सुद्धा ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांच्या निधनाचे वृत्त प्रसिध्द झाले आहे. तरी युवा प्रगती मार्फत गोखले कुटुंबाची आणि श्री गोखले यांच्या निकटवर्तीय यांची भावनांचा आदर ठेवून दिलगिरी व्यक्त करण्यात येत आहे. याबाबतचे खात्रीशीर वृत्त गोखले कुटुंबाकडून प्राप्त झाल्या नंतर वाचकांना नक्कीच कळविण्यात येईल. सध्या श्री विक्रम गोखले हे लाईफ सेंटरवर असून ईश्वर त्यांना दीर्घायुष्य देवो हीच आमची प्राथना.






