आमच्या पोलिसांचा काय दोष ? आम्ही काय अंतर्यामी आहोत का?

आमच्या पोलीस बांधवांचे निलंबन करण्यापेक्षा चुकीचे वक्तव्य करणाऱ्यांवर कारवाई करा, आणि तात्काळ सर्व ११ पोलीस बांधवांचे निलंबन मागे घ्या:- मयुर कारंडे (नवी मुंबई शहर अध्यक्ष:- महाराष्ट्र पोलीस बॉइज संघटना)

पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या शाहीफेक प्रकरणी पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्ताल्यातील 3 अधिकारी व 7 कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले. या घटनेचे पडसाद राज्यभर उमटताना दिसत आहेत.

या घटनेचा निषेध करीत पोलिसांवर केलेल्या कारवाईचा जाहीर निषेध नवी मुंबई शहर अध्यक्ष:- महाराष्ट्र पोलीस बॉइज संघटना मयुर कारंडे यांनी केला आहे.

शाही फेकण्याचा प्रकार झाला त्याबद्दल पोलिसांनी खूप प्रोटेक्शन माननीय चंद्रकांत दादा पाटील यांना दिले होते. ज्यांनी शाई फेकली ते कोण आहेत काय याच्याशी आम्हाला घेणं देणं नाही पण आम्ही कायदा आणि त्या संविधानाचे रक्षक आहोत ज्या छत्रपती शिवाजी महाराज, मा.डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी या समाजामध्ये कायदा व सुव्यवस्था राखण्याचं काम हे पोलिसांच्या खांद्यावर दिले त्याचं काम आम्ही करतोय.  कुठल्याही राजकारणाचा विषय आला तर चोर सोडून संन्यासाला फाशी दिली जाते आणि शेवटी बळीचा बकरा होतो तो पोलीस… आमच्या पोलिसांचा काय दोष आम्ही काय आंतर्यामी आहेत का?  आमच काय अस्तित्व आहे? बस झाल आता नाही सहन करणार. अशी खरमरीत प्रतिक्रिया मयुर कारंडे यांनी व्यक्त केली आहे.

याबाबत ते म्हणाले, “आमच्या पोलिसांना तात्काळ सन्मानाने रुजू करा तेव्हाच या पोलीस खात्याचा सन्मान होईल नाहीतर असे प्रकार पोलिसांचं व पोलीस परिवारांचं मनाचे खच्चीकरण करण्यासारखं होईल.  एवढीच विनंती करतो नाहीतर उद्या राज्यभर महाराष्ट्र पोलीस परिवार व महाराष्ट्र पोलीस संघटना तीव्र आंदोलन छेडणार आहे याची नोंद घ्यावी.”