
सातारा: सातारा पोट निवडणुकीत साताऱ्याच्या गादीचे वारसदार आणि भाजपामधून निवडणूक लढविणारे उदयनराजे भोसले यांनी पराभूत झाल्यानंतर प्रथमच ट्विट करून मतदार आणि कार्यकर्ते यांचे आभार मानले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस मधून निवडून येऊन देखील अवघ्या तीन महिन्यात राष्ट्रवादीला सोड चिट्टी देवून भाजपवासी झाले. भाजपामधून पोटनिवडणूक लढवली परंतु शरद पवार यांच्या करीष्मांने श्रीनिवास पाटील यांनी उदयनराजे भोसले यांना पराभवाची धूळ चाखायला लावली. पराभवानंतर प्रथमच ट्विटर वर प्रतिक्रिया देताना उदयनराजे म्हणाले की, “हरलो पण थांबलो नाही, जिंकलो नाही तरी संपलेलोही नाही. ज्या कार्यकर्त्यांनी दिवसरात्र निवडणूक काळात मेहनत घेतली तसेच जनतेने जे मतदान केले त्याबद्दल आभार.”






