ओरिएंटल इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट वाशी नवी मुंबई आयोजित अंतर्गत पथनाटय स्पर्धा संपन्न

ओरिएंटल इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट वाशी नवी मुंबई आयोजित अंतर्गत पथनाटय स्पर्धा २१ डिसेंबर २०२२ रोजी ओ. आय. एम “बसकर्स फेस्ट २०२२” या शीर्षकाने पार पाडण्यात आली. या स्पर्धेचा उद्देश हा सामाजिक विषयांवर उजळणी करण्याचा होता.

 

या कार्यक्रमात हाताळलेले विषय ते म्हणजे महिला सक्षमीकरण, भारतातील होणाऱ्या आत्महत्या, भारतीय सैनिक दल, सोशल मिडिया, कॉर्पोरेट संस्कृती हे होते. या कार्यक्रमात सहभागी झालेल्या सर्व विद्यार्थी प्राध्यापक, शिक्षकवर्ग आणि कर्मचारी यांचा उत्साह गगनात भिडणारा होता. यांपैकी ज्या विषयाने विजेतेपद पटकावले तो विषय म्हणजे ‘महिला सक्षमीकरण’ या कार्यक्रमाचा मूळ उद्देश म्हणजे आपल्या अंतर्गत सकारात्मक विचारांना प्रोत्साहन देण्याचा व मॅनेजमेंटचे विविध कनस्पेटस शिकण्याचा होता.

ओरिएंटल इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट वाशी या संस्थेचे संचालक डॉ. युसूफ खान आणि डॉ. मौमिता रॉय (एमएमएस, प्रोग्राम हेड) यांनी विदयार्थ्यांना संबोधित केले आणि त्यांच्या विचार प्रक्रियांचे कौतुक केले. प्रोफेसर स्वाती घोष (एमएमएस, प्लेसमेंट हेड ) डॉ. राघवेंद्र बेंडीगेरी (एमएमएस, फॅकल्टी), डॉ. अमी नगर (एमएमएस, फॅकल्टी) यांनी देखील स्पर्धेत भाग घेणाऱ्या विदयाथ्यांचे मनोबल वाढवले. शेवटी कार्यक्रमात उपस्थित प्रत्येकाने भारतातील एक जबाबदार नागरीक होण्याची शपथ घेतली.