उद्धव ठाकरे यांचा सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत ठाकरे गटाची बैठक नागपुरात आयोजित करण्यात आली. या बैठकीत उद्धव ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले. या बैठकीत ठाकरे यांनी सत्ताधाराऱ्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. भाजपमध्ये प्रवेश केल्यावर चंपी मालीश होते, असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी सत्ताधाऱ्यावर जोरदार निशाणा साधला.

उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी या बैठकीत भाजप आणि शिंदे गटाचा खरपूस समाचार घेतला. उद्धव ठाकरे म्हणाले, ‘ज्याला शत्रू नाही, तो कसला मर्द. माझ्या वडिलांचं नाव चोरत आहेत. पक्षाचं नाव, धनुष्यबाण चोरत आहेत. सामन्याला पुढे या मग सांगतो. आम्ही काय करतो. बाळासाहेब ठाकरे यांचे शहरात बॅनर आहेत. ते फोटो मी काढले आहेत’.

आपण तर घोटाळे काढूच, पण टाचणी भाजप तर लावत नाही ना, असा सवाल उद्धव ठाकरे यांनी केला. तर महाराष्ट्रात मध्यावधी लागली, तर हे तोतये भाजपच्या जीवावर लढणार का? असाही सवाल त्यांनी केला.

‘ आम्ही रोज बॉम्ब फोडत आहोत. किती बॉम्ब फोडायचे, हे सर्व घोटाळेबाज घोटाळ्यापासून वाचण्यासाठी तिकडे गेले काय? भाजपमध्ये गेलेले हर्षवर्धन देशमुख म्हणाले होते, आता छान झोप येते. भाजपमध्ये गेल्यावर चंपी मालीश होते, असा हल्लाबोल उद्धव ठाकरे यांनी केला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भावना चांगली आहे, पण आजूबाजूचे लोक प्रामाणिक हवे ना. आपण रात्री पळून काही करत नाही. दिवसा ढवळ्या करतो. मला किंमत नाही, आज उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची सभा आहे. मी म्हणजे शून्य आहे, मी त्याच नम्र भावनेतून काम करतो, असेही उद्धव ठाकरे पुढे म्हणाले.

संजय राऊत यांना सोन्याचं ताट घेऊन रांगोळी काढून बोलावले. पण ते गेले नाही. युतीमध्ये विदर्भावर लक्ष दिले नाही. पण आता नाही. आता आम्ही विदर्भात ताकद वाढवू. शिवसेना म्हणजे गद्दार नाही हा विचार आहे. तुम्ही जोपर्यंत सोबत आहात, तोपर्यंत मी संपू शकत नाही, असा विश्वास उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला.