
नवी मुंबई : प्रगती फ़ॉऊडेशन आयोजित “प्रोजेक्ट हसी एक अनोखी मुस्कान” हा कार्यक्रम 24 व 25 फेब्रुवारी 2023 रोजी गिरिजा वेलफेअर असोसियशन ह्या संस्थेच्या वृध्द आश्रमात व अनाथ आश्रमात पार पाडण्यात आला.
कार्यक्रमाचा मुळ उद्देश म्हणजे वृध्द आश्रमातील वृध्दाना विरूंगळा व करमणुक करण्याचा तसेच अनाथ आश्रमातील मुलांना मुलांची फ़िजिकल व मेंटल स्किल्स डेव्हलपमेंट करण्याचा उद्देश होता.

कार्यक्रमाचे नियोजन प्रगती फॉऊडेशन या संस्थे मार्फत करण्यात आले होते. तसेच श्री हरीहरपुत्र भजन समाज यांचे देखील सहकार्य लाभले. डॉ. किरण राणे (प्रेसिडिंट, प्रगती फॉऊडेशन), सौ सिध्दी राणे (मेंबर, प्रगती फॉऊडेशन) तसेच गिरजा वेलफेअर असोसियशन चे चेअरमन श्री. वसंत गुजांळ व त्याचे सर्व सहकारी ह्यांच्या सहकार्याने हा पुर्ण कार्यक्रम राबवण्यात आला.
ओरिंयटल इन्स्टीटुट ऑफ मॅनेजमेंट येथील मास्टर ऑफ़ मॅनेजमेंट स्डजीस च्या विद्यार्थांनी ह्या कार्यक्रमात सहभाग घेतला होता.

यातील विद्यार्थांना भेटलेला लाभ म्हणजे एक जागृत नागरिक म्हणुन समाज कार्य करणे तसेच मॅनेजमेंटचे विविध संकल्पना शिकण्याचा हेतु होता.
ओरिंयटल इन्स्टीटुट ऑफ मॅनेजमेंट चे गुरुजनक आणि या विद्यार्थांनचे प्रोजेक्ट गाईड डॉ. मौमिता रॉय (प्रोग्राम हेड एम.एम.एस.), डॉ. राघवेंद्र बेंडीगेरी (फाकॅलटी, एम.एम.एस), प्रोफेसर स्वाती घोष (फाकॅलटी, एम.एम.एस), आणि डॉ. अमी नगर (फाकॅलटी, एम.एम.एस) यांनी विध्यार्थांना हा कार्यक्रम करण्यास प्रोत्सहान दिले.

या कार्यक्रमामध्ये भाग घेतलेल्या विद्यार्थांचे नावे पुढीलप्रमाणे आहेत.
साहिल शिंदे, गौरव गुलाठी, अभिषेक मंडल, अभिषेक घरडे, जसिका बेकम, उद्देशा परते, गरिमा सिंग, पुजा अन्बलगन, श्रेयशी शिवाळे, मित बराय आणि रित्विजा खन्ना अश्या प्रकारे आहेत.







