
मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी बंधपत्रित डॉक्टर्सच्या मानधनात वाढ करण्याचा तसेच कंत्राटी डॉक्टर्सचे व त्यांचे मानधन समान करण्याचा निर्णय जाहीर केला आहे. कोरोनाच्या संकट काळात विविध हॉस्पिटल मध्ये आरोग्य सेवकांचा, नर्सचा, आणि डॉक्टरांचा तुडवडा भासत आहे. त्यातच कोरोनाने अनेक डॉक्टरांना लक्ष बनविले आहे अशा परिस्थितीत सुद्धा राज्यातील डॉक्टर आपली सेवा विविध हॉस्पिटलात देत आहेत. अनेक दिवसांपासून डॉक्टरांच्या मानधनात वाढ करण्याबाबतची मागणी प्रलंबित होती. मुख्यमंत्र्यांच्या या मानधन वाढीच्या निर्णयामुळे राज्यातील डॉक्टरांचे मनोधैर्य वाढविणारे ठरणार आहे. यामध्ये डॉक्टरांना 75,000 हजारापासून 85,000 पर्यंत मानधन मिळणार आहे.
दुर्गम भागातील डॉक्टर : 60,000/- वरून 75,000/-
दुर्गम भागातील तज्ञ डॉक्टर: 70,000- वरून 85,000/-
इतर भागातील एम बी बी एस डॉक्टर: 55,000/- वरून 70,000/-
इतर भागातील तज्ञ डॉक्टर: 65,000/- वरून 80,000/-
CM Uddhav Balasaheb Thackeray has announced a substantial hike in the honorarium of doctors serving their bonds to bring it at par with doctors working on contract basis. This will further strengthen their resolve in this #WarAgainstVirus.






