अप्पासाहेब धर्माधिकारी यांना रविवारी महाराष्ट्र भूषण पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं, मात्र या पुरस्कार सोहळ्यात उष्मघातामुळे 11 जणांचा मृत्यू

अप्पासाहेब धर्माधिकारी यांचा रविवारी महाराष्ट्र भूषण पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला.

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते आप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार देण्यात आला, यावेळी त्यांच्यासोबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसदेखील उपस्थित होते.

नवी मुंबईच्या मैदानामध्ये या पुरस्कार सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं. मात्र या पुरस्कार सोहळ्याला गालबोट लागलं.

ज्येष्ठ निरुपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी (Appasaheb Dharmadhikari) यांना यंदाच्या महाराष्ट्र भूषण पुरस्काराने गौरवण्यात आलं.  केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shaha) यांच्या हस्ते आप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार पुरस्कार प्रदान करण्यात आला.

नवी मुंबई येथील खारघरमधील सेंट्रल पार्क मैदानावर महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळा दिमाखात पार पडला. परंतु या कार्यक्रमानंतर अनेकांना उष्माघाताचा त्रास झाला. त्यात अकरा जणांचा मृत्यू झाला.

या कार्यक्रमात आलेल्या 11 जणांचा उष्माघातामुळे मृत्यू झाला आहे, तर काही जणांवर उपचार सुरू आहेत.

घटनेची माहिती मिळताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) रात्री आठ वाजता आजारी श्री सदस्यांना भेटण्यासाठी कामोठेतील एमजीएम रुग्णालयात (MGM Hospital) पोहोचले.

यावेळी उपाचप घेत असलेल्या रुग्णांची संवाद साधला, त्यांची विचारपूस केली. त्याचबरोबर तेथील डॉक्टर्ससोबत चर्चा करून उपचाराबाबत माहिती घेतली. याशिवाय एमजीएम रुग्णालयात दाखल असलेले रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांच्या समन्वयासाठी पनवेल महापालिकेचा उपायुक्त दर्जाचा अधिकारी नियुक्त करण्याचे निर्देश दिले. तसंच रुग्ण आणि नातेवाईकांची गैरसोय होणार नाही याची दक्षता घेण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिल्या.

मुख्यमंत्र्यांनंतर उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, अजित पवार यांच्यासह अरविंद सावंत आणि विनायक राऊत हे देखील एमजीएम रुग्णालयात पोहोचले. इथे त्यांनी आजारी असलेल्यांची विचारपूस केली.

दरम्यान या घटनेनंतर रुग्णालयात उपचार सुरू असलेल्या रुग्णांची राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भेट घेतली.

सरकारने महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्याची वेळ योग्य ती ठरवायला हवी होती. भर दुपारी कार्यक्रम घेणं चुकीचं होतं. कार्यक्रमासाठी मोठ्या प्रमाणावर खर्च केल्यानंतरही असं घडायला नको होतं अशी प्रतिक्रिया यावेळी अजित पवार यांनी दिली.

या घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी पाच लाखांची मदत जाहीर करण्यात आली आहे.

यावर आता ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

या कार्यक्रमावरून त्यांनी पुन्हा एकदा सरकारवर निशाणा साधला आहे. या कार्यक्रमात आलेल्या लोकांसाठी पुरेशी सोय उपलब्ध करून देण्यात आली नाही. कार्यक्रम भर दुपारी आयोजित करण्यात आला. हा कार्यक्रम संध्याकाळी आयोजित करता आला असता. मात्र या कार्यक्रमात श्री सदस्यांची नाही तर व्हिआपींची सोय पाहिली गेली, असा आरोप संजय राऊत यांनी केला आहे.