कोकण संस्थेचे कार्य वाखाणण्याजोगे : ” – ठाणे जिल्हा परिषद अध्यक्ष मंजुषा जाधव”

शिलाई उपक्रमातुन महिलांना स्वयंरोजगार उपलब्ध व्हावा यासाठी जिल्हापरिषेमार्फत सहकार्य करणार

ठाणे / प्रतिनिधी: कोकण कला व शिक्षण विकास संस्था आणि कसारा ग्रुप ग्रामपंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने आज विठ्ठल – रुक्मिणी मंदिर हॉल कसारा येथे शिलाई मशीन प्रशिक्षण कार्यक्रमाला श्रीफळ वाढवून सुरुवात करण्यात आली.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ठाणे जिल्हा परिषद अध्यक्ष मंजुषा जाधव, तर प्रमुख पाहुण्या म्हणून कसारा ग्रुप ग्रामपंचायत सरपंच प्रियांका जाधव,उपसरपंच रमेश भोईर, ग्रामविकास अधिकारी दिनेश पाकळे, पंचायत समिती सदस्य सुमन घारे उपस्थित होते.

शहापूर तालुक्यात कोकण संस्थेचे कार्य अतिशय उपयुक्त असून यातून महिलांना स्वयंरोजगार उपलब्ध होईल, स्वयंरोजगार सुरू करण्यासाठी ज्या महिलांना शिलाई मशीनची गरज असेल त्यांना जिल्हा परिषदेमार्फत ती मोफत उपलब्ध करून दिली जाईल असे “ठाणे जिल्हा परिषद अध्यक्ष मंजुषा जाधव” यांनी आपल्या भाषणात सांगितले. तर महिलांना स्वतःच्या पायावर उभे करण्यासाठी ग्रामपंचायत सदैव पुढाकार घेईल असे सरपंच प्रियांका जाधव यांनी नमूद केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थाध्यक्ष दयानंद कुबल यांनी तर आभार शहापूर प्रोजेक्ट व्यवस्थापक पंढरी भाला यांनी मानले.

या कार्यक्रमाला या विभागातील संस्थेच्या शिक्षिका चंदा मुसळे, नर्सिंग शिक्षिका माधुरी पडवळ, सरिता पाटील, कल्पना भाला, शिक्षिका पूजा देवकर, शिक्षिका पिंटी शिंगवे,शिक्षिका आफ्रिन शेख, शिक्षिका अश्विनी, कॉर्डिनेटर सुरज कदम आणि मोठया संख्येने महिला उपस्थित होत्या.