अमरनाथ यात्रेकरूंना माघारी बोलावले

नवी दिल्ली: अमरनाथ यात्रेवर दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता आहे, अशी खात्रीशीर माहिती दिल्यानंतर अमरनाथ यात्रा थांबवण्यात आली आहे. सुरक्षादलांकडून अमरनाथ यात्रेकरूंवरील हल्ल्याचा कट उधळवून लावण्यात आला आहे, अशी माहिती लेफ्टनंट जनरल केजेएस ढिल्लन यांनी दिली. ते पत्रकार परिषदेत बोलत होते.

सुरक्षेच्या कारणास्तव अमरनाथ यात्रेवर असलेल्या भाविकांनी आणि पर्यटकांनी शक्य तितक्या लवकर निघून यावे, असे आवाहन जम्मू काश्मीर सरकारच्यावतीने करण्यात आले आहे. ४ ऑगस्टपर्यंत अमरनाथ यात्रा मार्ग बंद करण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे.