
प्रभाग क्रमांक ३१, जुईनगर, नवी मुंबई आयोजित “एक सही संतापाची” या उपक्रमात जुईनगर मधील नागरिकांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला व सध्याच्या महाराष्ट्रातील राजकीय परिस्थितीवर संताप व्यक्त केला. तसेच मतदार म्हणून त्यांच्या मताला काहीच किंमत राहिली नाही असेही मत व्यक्त केले.

३०० हून जास्त लोकांनी सही करून त्यांचा संताप व्यक्त केला व तसेच भविष्यामध्ये राज साहेब ठाकरे हे महाराष्ट्राची धुरा सांभाळू शकतात अशी अशा व्यक्त केली. या कार्यक्रमाच्या निमित्ताने लोकांमध्ये सध्याचा राजकीय विटंबना करणाऱ्यांचा विरोधात किती चीड आहे हे दिसून आले.

कार्यक्रमाला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नवी मुंबईतील खालील पदाधिकारी उपस्थित होते;
विभाग अध्यक्ष अक्षय भोसले, उपविभाग अध्यक्ष अजय मोरे आणि मंगेश जाधव, शाखा अध्यक्ष मयूर करंडे आणि संकेत बोडके, उपशाखा अध्यक्ष सुशांत घोरपडे आणि पवन बुधे, महिला सेना उपशहर अध्यक्षा अनिता नायडू, महिला उपविभाग अध्यक्षा विद्या इनामदार , विद्यार्थी सेना उपशहर अध्यक्ष प्रतिक खेडकर, विद्यार्थी सेना शाखा अध्यक्ष अक्षय शेळके व महाराष्ट्र सैनिक श्रीकांत मुरकर, अर्जुन वाघमारे, सुरज कनोजिया आणि अर्जुन सोनवणे उपस्थित होते.
प्रमुख उपस्थिती मनसे शहर सचिव सचिन कदम व उपशहर अध्यक्ष सविनय म्हात्रे यांची होती.






